घरदेश-विदेश'पायलट' यांचं विमान पुन्हा एकदा काँग्रेसच्या धावपट्टीवर; राहुल गांधींना भेटणार

‘पायलट’ यांचं विमान पुन्हा एकदा काँग्रेसच्या धावपट्टीवर; राहुल गांधींना भेटणार

Subscribe

सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्वाशी साधला संपर्क, राहुल गांधीकडे भेटीसाठी मागितली वेळ

राजस्थानमधील राजकीय सत्ता नाट्यानंतर बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये परतण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. महिनाभरापासून राजस्थानातील संपूर्ण घडामोंडीवर मौन बाळगून असलेल्या सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती काँग्रेसच्या दोन नेत्यांनी दिली आहे. राजस्थान सरकार पाडण्याचं आणि आमदारांच्या घोडेबाजाराचे आरोप पायलट यांच्यावर लावले गेले आहेत. दरम्यान, पायलट यांनी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. दुसरीकडे राजस्थान कॉंग्रेसच्या आमदारांनी पायलट व बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजस्थानात विधानसभेचे सत्र १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. याशिवाय बंडखोर १८ आमदारांनाही पायलट यांच्यासमवेत राहुल गांधींची भेट घ्यायची आहे. मात्र, अद्यापपर्यंत राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राहुल गांधींच्या कार्यालयाकडून भेटायला अद्याप वेळ देण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पायलट कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या संपर्कात असून त्यांच्यामार्फत राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ही बैठक झाल्यास राजस्थानमधील सध्या सुरू असलेले राजकीय संकट संपू शकते असा दावा केला जात आहे.

- Advertisement -

बंडखोर आमदारांनी काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली

राजस्थान कॉंग्रेसच्या काही बंडखोर आमदारांनी पक्षाकडे संपर्क साधला आहे. त्यांच्यापैकी काहींनी वरिष्ठ नेतृत्त्वाची भेटही घेतली आहे आणि पक्षाने त्यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगितलं आहे. त्यानंतर ते वरिष्ठ नेतृत्वास भेटण्यास आणि तक्रारी करण्यास परवानगी आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याचवेळी, भाजपचे आमदार रामलाल शर्मा म्हणाले, राजस्थान भाजप विधिमंडळ पक्ष उद्या संध्याकाळी चार वाजता बैठक घेणार आहे.

काँग्रेसच्या आमदारांची बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी

राजस्थान कॉंग्रेसच्या आमदारांनी रविवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सचिन पायलट व इतर बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की आपण पक्ष हाय कमांडसमोर बंडखोर आमदारांचा बाजू घेणार नाही.

- Advertisement -

भाजपचे आमदार दिलावर यांची याचिका उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली

सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे आमदार मदन दिलावर यांची याचिका उद्यासाठी तहकूब केली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकेने आव्हान दिलं होतं, त्यामध्ये न्यायालयाने राजस्थान विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. वस्तुतः राजस्थान विधानसभेत बसपाच्या ६ आमदारांना कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची परवानगी सभापतींनी दिली होती.

भाजपही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार

भाजपही आता कॉंग्रेसच्या मार्गावर चालला आहे. ११ ऑगस्टला ते आपल्या आमदारांना जयपूरमधील हॉटेलमध्ये ठेवतील असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्याचबरोबर बसपा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदारांना हॉटेलमध्ये किती काळ ठेवणार याचा निर्णय घेईल. कॉंग्रेसविरोधात निर्णय आल्यास अविश्वास ठराव आणून भाजपचे आमदार बहुमताच्या चाचणीची मागणी करतील.


हेही वाचा – अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बहुमतानेच घेतला – राज्य सरकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -