घरदेश-विदेशशाहीन बाग गोळीबार : 'आप'चं नाव घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

शाहीन बाग गोळीबार : ‘आप’चं नाव घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

Subscribe

शाहीन बागेत आंदोलकांना धमकावून हवेत गोळीबार करणारा कपिल बैसल आम आदमी पक्षाचा सदस्य आहे, असं वक्तव्य करणारे दिल्ली क्राईम ब्रांच पोलीस उपायुक्त रादेश देव यांना निवडणूक कामातून मुक्त करण्यात आले आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई करत आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांना पत्र लिहून राजेश देव यांच्यावर निवडणुकीची कोणतीही जबाबदारी सोपवली जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत. देव यांच्या दाव्यानंतर भाजप आणि काँग्रेसने आम आदमी पक्षाविरोधात आणि अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करायला सुरुवात केली होती.

नक्की झालं काय?

सीएए आणि एनआरसीविरोधात दिल्लीच्या शाहीन बागमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव आणि विशेषत: महिला आंदोलनाला बसल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या आंदोलकांना कपिल बैसल नावाच्या एका तरुणाने धमकावर हवेत गोळीबार केला होता. त्यावरून देशभरात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हा धार्मिक कट्टरतावाद्यांकडूनच आंदोलकांवर केलेला हल्ला असल्याची टीका होऊ लागली होती. मात्र, पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी कपिल बैसल आम आदमी पक्षाचा सदस्य असून त्याच्या मोबाईलमधून त्याच आपमध्ये प्रवेश करतानाचे फोटो असल्याचा दावा केला होता. त्यावरून पुन्हा भाजपकडून अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केलं जाऊ लागलं होतं.

- Advertisement -

भाजप पोलिसांचा वापर करतंय – केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मतदान काही दिवसांवर आलेलं असताना आणि निवडणूक आयुक्तांना या काळात सर्व अधिकार असताना राजेश देव यांनी कपिल बैसलच्या चौकशीतील बाबी सार्वजनिक कुणाला विचारून केल्या? शिवाय कोणत्याही पक्षाचं नाव त्यांनी कोणत्या आधारावर घेतलं? असा प्रश्न आपकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, ‘निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजप पोलिसांचा वापर करत आहे’, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


वाचा सविस्तर – शाहीन बागमध्ये गोळी झाडणारा आपचा कार्यकर्ता?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -