घरदेश-विदेशराज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश यांची निवड

राज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश यांची निवड

Subscribe

राज्यसभा उपसभापती पदी एनडीएचे उमेदवार खासदार हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. या निवड प्रक्रीयेकरता आज राज्यसभेत निवडणूक पार पडली. हरिवंश यांना १२५ मतं मिळाली.

राज्यसभा उपसभापती पदी अखेर एनडीएचे उमेदवार खासदार हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. या निवड प्रक्रीयेकरता आज राज्यसभेत निवडणूक पार पडली. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकूण २०६ मतं पडली असून यामध्ये एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना ११५ मतं मिळाली. पहिल्या फेरीवेळी दोन मतदार अनुपस्थित होते. मात्र यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर त्या दोन मतदारांना स्लिपच्या माध्यमातून मतदान करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रीया पार पडली. यामध्ये एकूण २२२ मतं पडली असून यामध्येही एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना १२५ मतं, तर युपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांना १०५ मतं मिळाली. हरिवंश यांनी २० मतांनी आघाडी घेत उपसभापती पदाचा मान पटकावला.

विरोधकांचा मिश्किल टोला 

हरिवंश नारायण सिंह यांची उपसभापती पदावर निवड झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेता गुलाम नवी आझाद यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले, ‘हरिवंशजी हे काही ठरावीक पक्षाचेच नाही तर संपूर्ण सभेचे उपसभापती आहेत. मी नेहमीच असे मानतो की उपसभापती हे विरोधकांच्या बाजूने जास्त असातात.’

- Advertisement -


कोण आहेत हरिवंश?

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्वासू असलेले हरिवंशराय हे जेडीयुचे राज्यसभा सदस्य आहे. त्यांना पत्रकारितेचा देखील अनुभव आहे. हरिवंशराय यांनी प्रभात या वृत्तपत्राची २५ वर्षे संपादकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी देखील त्यांचे उत्तम संबंध होते.

कोण आहेत हरिप्रसाद?

हरिप्रसाद हे काँग्रेसचे महासचिव आहेत. ११९० साली राज्यसभेचे सदस्य झालेले हरिप्रसाद राज्यसभेमध्ये कर्नाटकचे नेतृत्व करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -