घरदेश-विदेशअयोध्या: मंदिर बांधकाम सुरू; बांधकामापूर्वी सापडले प्राचीन शिल्पांसह शिवलिंग!

अयोध्या: मंदिर बांधकाम सुरू; बांधकामापूर्वी सापडले प्राचीन शिल्पांसह शिवलिंग!

Subscribe

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमार्फत हे काम सुरू असताना काही ऐतिहासिक अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाले आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमार्फत हे काम सुरू असताना काही ऐतिहासिक अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे. या अवशेषांमध्ये अनेक पुरातत्व शिल्पांचे खांब व शिवलिंग आहेत. अमलक, कलश यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, या जन्मभूमी परिसरात राम मंदिर बांधण्यासाठी जमिन सपाटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टेन्सिंग पाळत या ठिकाणी काम सुरू असताना हे ऐतिहासिक अवशेष जमिनीचे खोदकाम करताना सापडले आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात येणाऱ्या नियोजित ठिकाणी जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले असून, खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितलं.

- Advertisement -

”मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे,” अशी माहितीही राय यांनी दिली.

गेल्या दहा दिवसांपासून रामजन्मभूमी परिसरात तीन जेसीबी मशीन, एक क्रेन, दोन ट्रॅक्टर आणि १० मजूरांच्या सहाय्याने उत्खननाचे काम सुरू आहे. हे काम टप्प्याटप्प्याने केले जात असून ट्रस्टकडून या पुरातत्व अवषेश जतन करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली. तसेच लॉकडाऊन संपताच या कामाकरिता राजस्थान, गुजरात आणि मिर्झापूर येथून कामगारांना बोलावण्यात येईल. या कार्यशाळेच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी तैनात आहेत.


CoronaVirus: न्यूयॉर्कसारखी मुंबई बनणार कोरोनाची राजधानी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -