आमच्यासाठीही न्यूड फोटोशूट कर; पेटाचे रणवीर सिंहला लेटर

ranveer singh nude photoshoot viral peta invites actor for posing nude for campaign

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीरच्या या फोटोवरून बराच वादही झाला. अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली, तर काहींनी त्याचे समर्थन केले. अशात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा इंडियाने (PETA)(पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स ) रणवीर सिंहला एक पत्र लिहिले आहे, या पत्रात त्यांनी रणवीर सिंहला लोकांना शाकाहारी होण्यासाठी जागरुक करण्यासाठी न्यूड पोज देत कॅम्पेन प्रमोट करण्याची मागणी केली आहे.

पेटाने पत्रात नेमक काय म्हटलं?

पेटाने रणवीर सिंहला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आम्ही तुझे पेपर मासिकाचे फोटोशूट पाहिले. आम्हाला आशा आहे की, तू आमच्यासाठीही पॅट्सचे बलिदान देशील. प्राण्यांवर तुझे किती प्रेम आहे हे आम्हाला माहित आहे? पेटा इंडियाच्या एका जाहिरातीसाठी तु न्यूड फोटोशूट करू शकतोस का? पेटाच्या या जाहिरातीची टॅगलाईन, प्रत्येक प्राण्याकडे एकसमान अवयव असतात, तुम्ही शाकाहारी बनण्याचा प्रयत्न कराल का? अशी असेल. मी एक इमेज जोडली आहे, ज्यामध्ये पामेला अँडरसनचे फिचर केले आहे.

या पत्राच्या शेवटी शाकाहारी असणे किती महत्वाचे आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले आहे. यासोबतच रणवीर सिंहला सोबत घेऊन या मोहिमेला प्रोत्साहन देण्याचेही आवाहन केले आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे यापूर्वी बराच वाद झाला. अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, पण इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला. करीना कपूर खानपासून ते विद्या बालन, आमिर खान, जान्हवी कपूरपर्यंत सर्वांनीच प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे.

नुकतेच आमिर खानने रणवीर सिंहचे फोटोशूट अतिशय बोल्ड असल्याचे म्हटले. तर करीना कपूर खान म्हणाली की, लोकांकडे खूप मोकळा वेळ आहे, म्हणून ते याबद्दल बोलत आहेत. या न्यूड फोटोशूटवर एवढा गदारोळ का होतोय हे तिला समजत नाहीये., रणवीर सिंहच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाल्यास, त्याच्याकडे सध्या दोन चित्रपट आहेत ज्यावर तो काम करत आहे. ‘सर्कस’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.


हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’मधील ‘देवा देवा’ गाण्याचा टीझर रिलीज