घरदेश-विदेशLockDown: पित्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने घटना उघडकीस

LockDown: पित्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने घटना उघडकीस

Subscribe

तालिळनाडूतील मायलादुत्रयीमध्ये जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात हा नराधम आपल्यावर मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली. तामिळनाडूच्या मायलादुत्रयी येथील नागपट्टिनम येथे ही घटना घडली. एका १४ वर्षीय मुलीवर तिचाच जन्मदाताच वारंवार अत्याचार करत होता. ही बाब उघडकीस आल्यावर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. या प्रकरणाची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसात केली.

हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू?

- Advertisement -

आईनेच केली पोलिसात तक्रार 

अल्पवयीन मुलीची तब्येत वारंवार बिघडू लागली. तिची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. दरम्यान, डॉक्टरांच्या तपासणीमध्ये ती मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराची केस दाखल केली असून आरोपी पित्याला अटक केली आहे. तसेच पॉस्को अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयिन कोठडीत टाकण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -