घरदेश-विदेशममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बंगाल हे कायदा सुव्यवस्थाहीन राज्य, रविशंकर प्रसाद यांचा आरोप

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बंगाल हे कायदा सुव्यवस्थाहीन राज्य, रविशंकर प्रसाद यांचा आरोप

Subscribe

 नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये झालेल्या गदारोळावरून मंगळवारी भाजपने ममता सरकारवर जोरदार निशाणा साधला. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये अत्याचार आणि राजकीय हिंसाचाराचा कळस झाला. बंगाल हे बौद्धिक परंपरेचे, सांस्कृतिक परंपरेचे राज्य राहिले आहे, परंतु ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली ते एक कायदा सुव्यवस्थाहीन दिवाळखोर राज्य बनले आहे. ‘ममताजी बंगालच्या बाहेर लोकशाही वाचवण्याविषयी बोलतात. मात्र, त्यांनी बंगालमध्ये लोकशाही अधिकारांचे उल्लंघन करून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

मंगळवारी भाजपने पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. या मार्चमध्ये मोठा गदारोळ झाला होता. भाजपच्या मोर्चादरम्यान टीएमसी समर्थकही त्यांच्यासमोर आले. यावेळी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.

- Advertisement -

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका –

काल बिहारमधील बेगुसराय येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर रविशंकर प्रसाद यांनी नितीश सरकारला गोत्यात टाकत अनेक आरोप केले. यावर माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘नितीश बाबू तुमचे मंत्री, जो राजद प्रदेशाध्यक्षांचा मुलगाही आहे, असे म्हणत आहेत की माझे सरकार चोरांचे आहे आणि मी त्याचा राजा आहे. अप्रतिम…सुशासन बाबू, नवीन मित्रांसोबत तुमची काय स्थिती आहे आणि तुम्ही काहीही करण्याची हिंमत करू शकत नाही.

- Advertisement -

यासोबतच ते म्हणाले की, नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यावर ते म्हणाले की, कृपया दिल्लीत कायदा सुव्यवस्था असल्याचा दीखावा करणे बंद करा. आधी तुमच्या घराची (बिहार) काळजी घ्या. बिहार हाताळण्याचा प्रयत्न करा.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -