घरदेश-विदेश२० रूपयांची नवीन नोट; नोटेवर 'या' प्रसिद्ध पर्यटन स्थळाचा फोटो

२० रूपयांची नवीन नोट; नोटेवर ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळाचा फोटो

Subscribe

२० रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचादेखील वापर कायम राहणार आहे.

भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच २० रुपयाची नवी नोट दाखल होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून लवकरच ही नोट चलनात आणली जाणार आहे. ही नवीन येणारी नोट नवीन वैशिष्ट्ये आणि नवीन रंगातील असेल. गेल्या दोन-तीन वर्षांत मध्यवर्ती बँकेने ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटांसह २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत.

- Advertisement -

अशी आहे २० रूपयाची नवीन नोट

२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल. या नोटेच्या मागील बाजूस वेल्लोरा लेणींचे चित्र असणार आहे. दरम्यान २० रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचादेखील वापर कायम राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -