घरदेश-विदेशचेक पेमेंटच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल, सुट्टीच्या दिवशीही होणार चेक क्लिअर

चेक पेमेंटच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल, सुट्टीच्या दिवशीही होणार चेक क्लिअर

Subscribe

रिझर्व बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (NACH) आता 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चेकच्या माध्यमातून पेमेंट करताना ग्राहकांना खूप काळजी घ्यावी लागते. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने चेक पेमेंटच्या  नियमामध्ये काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.  येत्या 1 ऑगस्ट पासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुम्ही चेक पेमेंट करत आहात तर या नवीन नियमांबाबत जाणून घ्या. (RBI new rules about check payment )RBI ने जाहिर केलेल्या नियमावली नुसार 24 तासाच्या आत ब्लक क्लिअरिंग सुविधा जारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम प्रत्येकाच्या चेक पेमेंटवर होणार आहे.सध्या प्रत्येकाला चेक पेमेंट करण्यासठी 2 दिवसांचा कालावधी लागतो. पण या नियमावली अंतर्गत 2 दिवसांचा वेळ लागणार नाही. यासाठी बँकेच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम ठेवावी लागेल अशी माहिती देण्यात आली आहे. जर कोणताही खातेधारक बँकेत अकाऊंटमध्ये पैसे नसताना चेक क्लिअरिंगला देत असेल तर त्याचा चेक बॉउंस होऊ शकतो तसेच दंड देखील आकारण्यात येईल. कोणालाही चेक देण्यापूर्वी बँक खात्यात योग्य रक्कम आहे की नाही याबाबत खात्री करुनच चेक क्लिअरिंगला द्यावा.

रिझर्व बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (NACH) आता 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे सर्व नियम राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना पाळणे बंधनकार असणार आहे. यामुळे ग्राहकांना आत्ता सुट्टीच्या दिवशीही चेक क्लिअर होणार आहे.

- Advertisement -

या व्यतिरिक्त ग्राहकांसाठी आणखी एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. चेक व्यतिरीक्त इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट, गॅस, टेलिफोन, पाणी, EMI, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि इंशुरन्स प्रीमियमचे पेमेंटचीदेखील सुविधा देतात. त्यांना NACH ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संचालित करते. या सर्व प्रकारचे क्रेडिट ट्रान्सफर सारखे डिविडंड, इंटरेस्ट, सॅलरी पेंशन सुविधा देतात आता यासाठी ग्राहकांना सोमवारीची वाट पाहण्याची गरज नाही. शनिवार किंवा रविवारी देखील तुम्ही पेमेंट करू शकता.


हे हि वाचा- कोरोनाचा Delta व्हेरिएंट जगभरात सर्वाधिक परिणामकारक ठरेल, WHO चा इशारा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -