डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरन, डॉलरची किंमत 80.11 रुपये

doloar

नवी दिल्ली – आज डॉलरच्या तुलनेत रुपयांची मोठी घसरन झाली. डॉलच्या तुलनेत रुपयाची ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी आहे. यूएस फेडच्या प्रमुखांच्या संकेतामुळे रुपयामध्ये घसरण झाल्याचे बोलले जात आहे. यूएस फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी शुक्रवारी मध्यवर्ती बँकांसोबत झालेल्या बैठकीत महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर कमी करणे शक्य नसल्याचे सांगितले. या संकेतानंतर डॉलच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणखी घसरले. एका डॉलरची किंमत 80.11 रुपये झाली आहे. यापूर्वीच्या क्लोजिंगमध्ये एका डॉलरची किंमत 79.97 रुपये होती.

गेल्या महिन्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत मागचे सर्व विक्रम मोडले होते. तेव्हा एका डॉलरची किंमत 80.0650 रुपये होती. आजच्या घरसरणीने मागच्या महिन्याचा विक्रम मोडीत काढला आहे. कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण दिसली.

बाजाराला यूएस फेड सकारात्मक राहिल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्याकडून मिळालेले संकेत लोकांसाठी आणि व्यवसायासाठी सकारात्मक नाहीत. महागाई कमी करण्यासाठी इतकी कठोर पावले अपेक्षित नव्हती, अशी प्रतिक्रिया जिओजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे व्ही.के.विजयकुमार म्हणाले. घसरलेल्या रूपयाचा परिणाम एपीआयद्वारे होणाऱ्या गुंतवणूकीलाही झटका देऊ शकतो. गेल्या आठवड्यांत एफपीआयद्वारे गुंतवणूक वाढली आहे.