घरदेश-विदेशएक नंबरी आमदार! रुग्णसेवेसाठी आमदाराने ४० लाखांच्या फॉर्च्यूनरची केली रूग्णवाहिका

एक नंबरी आमदार! रुग्णसेवेसाठी आमदाराने ४० लाखांच्या फॉर्च्यूनरची केली रूग्णवाहिका

Subscribe

देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशावेळी कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयापर्यंत जाणं रूग्णवाहिकेच्या अभावी शक्य होत नाही. अशापरिस्थितीत कोरोना रूग्णाच्या मदतीस अनेक समाजातील दानशूर व्यक्ती आपला मोलाचा वाटा उचलताना दिसताय. देशभरात कोरोना महामारीच्या या संकटात माणूसकीचं दर्शनही सातत्याने देशभरात घडत आहे. असंच काहीसं जयपूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

जयपूरमध्ये एका आमदाराने आपली ४० लाख रुपयांची फॉर्च्यूनर गाडी रूग्णवाहिका बनवून गरजूंच्या उपचारांसाठी दिली आहे. देशभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केले आहे. दरम्यान जयपूरमधील गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असून या भागात रूग्णवाहिकेची सुविधा अतिशय वाईट आहे. यामुळे रुग्णांना वेळीच रूग्णालयात दाखल करता येत नाही. रूग्णवाहिकेची दयनीय अवस्था लक्षात घेता काँग्रेस नेते आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली महागडी कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली आहे.

- Advertisement -

मंगळवारी या आमदाराने आपली ४० लाख किंमतीच्या कारला रुग्णावाहिका स्वरूपात तयार करून रूग्णांच्या सेवेत हजर केली. यासंदर्भातील माहिती एका ट्विटच्या माध्यमातून समोर आली तर गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार सिंह यांनी एका व्हिडिओमध्ये असे सांगितले की, गावातील रुग्णांसाठी वेळेत रूग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी दाखल करता येत नाही किंवा त्यांची मोठी गैरसोय होते. तसेच, आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यास, मी माझी खासगी कार रुग्णांच्या सेवेसाठी देईल. या व्हिडिओनंतर मंगळवारी रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपली गाडी आरोग्य विभागाकडे दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान देशात २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवे कोरोनाबाधित आढळले असून एका दिवसात ४ हजार ५२९ जणांच्या मृत्यूची विक्रमी नोंद झाली आहे. तर ३ लाख ८९ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात २,६७,३३४ नवे रूग्ण आढळल्याने भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० वर गेला आहे. देशात २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

 

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -