घरदेश-विदेशभारत - चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्र्यांचे राहुल गांधी यांना उत्तर

भारत – चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्र्यांचे राहुल गांधी यांना उत्तर

Subscribe

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. घटनेनंतर विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. यावर राहुल गांधी यांनीही भारतीय लष्कराला शस्त्राविना का पाठवले, अशी विचारणा केली आहे. त्यांना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. जयशंकर म्हणाले की, गलवान खोऱ्यामध्ये भारत – चीन सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांकडे शस्त्र होती. परंतू जुन्या एका करारानुसार त्यांनी त्यांचा वापर केला नाही. शस्त्रविना भारतीय जवानांना चीनसमोर कस पाठवले होते, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे. सीमेवर सर्व जवानांकडे शस्त्र असतात. १५ जून रोजी गलवानमध्ये तैनात असणाऱ्या जवानांकडेही हत्यारे होती. मात्र १९९६-२००५ या काळातील करारानुसार अशा प्रसंगी बंदुकांचा वापर होत नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भारत – चीन चकमकीत २० जवान शहीद 

गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या लडाखमधील सीमेवर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मोठा तणाव आहे. हा तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना सोमवारी रात्री अचानक गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला.

हेही वाचा –

Coronavirus Update: आज राज्यात ३७५२ कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -