घरताज्या घडामोडीCanada event : कॅनडात इंदिरा गांधींच्या हत्येचा जल्लोष, परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला...

Canada event : कॅनडात इंदिरा गांधींच्या हत्येचा जल्लोष, परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला संताप

Subscribe

कॅनडामध्ये भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा जल्लोष करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. मला वाटतंय की, हा एक मोठा अंतर्निहित मुद्दा आहे. दोन देशांच्या संबंधांसाठी हे चांगलं नाही आहे. त्याचप्रमाणे कॅनडासाठीही चांगलं नाहीये. स्पष्टचपणे सांगायचं झालं तर व्होटबँकेच्या राजकारणाशिवाय असं कोण कशाला करेल? असा प्रश्न एस. जयशंकर यांनी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडामधील बेम्पटन येथे खलिस्तान समर्थकांनी हल्लीच इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवणारा चित्ररथ फिरवला होता. त्याचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट केलं की, कॅनडाच्या ब्रेम्पटन येथे ५ किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ दाखवण्यात आला, हे पाहून एक भारतीय म्हणून मला वेदना झाल्या.

- Advertisement -

कट्टरतावादाचा सार्वत्रिकपणे निषेध केला गेला पाहिजे. तसेच त्याचा मिळून सामना केला पाहिजे. ही कुणाची बाजू घेण्याचा विषय नाही. तर राष्ट्राचा इतिहास आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे झालेल्या वेदनेच्या सन्मानाची बाब आहे, असंही देवरा म्हणाले.

देवरा यांच्या ट्विटला टॅग करत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, मी पूर्णपणे सहमत आहे. हे निषेधार्ह आहे आणि एस जयशंकर यांनी कॅनडाच्या अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा सक्षमपणे मांडला जावा, अशी मी जयशंकर यांच्याकडे मागणी करतो, असंही जयराम रमेश म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Ukraine Floods : युक्रेनचे सर्वात मोठे धरण उद्ध्वस्त, २४ गावं जलमय, अनेक जण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -