घरताज्या घडामोडीFarmer protest: संयुक्त किसान मोर्चाची बुधवारी होणारी बैठक रद्द, ४ डिसेंबरला होणार...

Farmer protest: संयुक्त किसान मोर्चाची बुधवारी होणारी बैठक रद्द, ४ डिसेंबरला होणार महत्त्वाची बैठक

Subscribe

संयुक्त किसान मोर्चाची बुधवारी होणारी बैठक रद्द कऱण्यात आली आहे. पंजाबमध्ये ३२ शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. तर संयुक्त किसान मोर्चाची बैठक ठरल्यानुसार ४ डिसेंबर रोजी होणार आहे. केंद्र सरकारने शेतकरी संघटनेची ५ सदस्यांची टीम गठीत करण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमय करण्यासाठी ५ लोकांची नावे केंद्र सरकारने मागितली आहेत. या समितीबाबत अद्याप कोणताही निर्णय़ झाला नाही. ४ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीमध्ये समितीमधील लोकांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

शेतकरी नेते दर्शनपाल यांनी सांगितले आहे की, शेतकरी संघटनेच्या प्रकरणावर ४ डिसेंबरला निर्णय देणार आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबत राज्यसभेत आणि लोकसभेत विधेयक पारित करण्यात आले आहे. हे कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी मागील १ वर्षांपासून आंदोलन करत आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारने शेतकरी संघटनेकडून ५ सदस्यांच्या समितीमध्ये सामील असणाऱ्या लोकांची नावे मागितले आहेत. ही समिती केंद्र सरकारसोबत एमएसपीच्या मुद्द्यावर चर्चा करुन विचार विनिमय करेल. परंतु अद्याप शेतकऱ्यांकडून असा निर्णय घेण्यात आला नसल्याचे दर्शन पाल यांनी सांगितले आहे.

संयुक्त किसान मोर्चाकडून निवेदन जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा आणि निर्णय घेणारी बैठक बुधवारी घेण्यात येणार होती परंतु ४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये सर्व संघटनांचे मत जाणून घेऊन ५ सदस्यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. तर आता किसान मोर्चाची बैठकीच्या तारखेमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून तीन कृषी कायदे रद्द 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी होते परंतु एका गटाला समजवण्यात अपयश आल्यामुळे हे कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर शेतकरी आणि आधारभूत किंमत हमी कायदा करण्याची मागणी करत आहेत.


हेही वाचा : Omicron Threat: दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला ओमिक्रॉन; नवा खुलासा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -