घरताज्या घडामोडीUS School Shooting: १५ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेत केला गोळीबार; ३ जणांचा मृत्यू

US School Shooting: १५ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेत केला गोळीबार; ३ जणांचा मृत्यू

Subscribe

घटनेचा अजूनही तपास सुरू

अमेरिकेच्या मिशिगनच्या एका शाळेत एका विद्यार्थ्याने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एका शिक्षकासह ८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिशिगनच्या ऑक्सफोर्ड शाळेत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. गोळीबार करणारा विद्यार्थी अवघ्या १५ वर्षांचा होता. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

ऑललँड काउंटीच्या अंडरशेरिफ मायकल जी. मॅककेबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एका मुलाचे वय १६ होते तर दोन मुलींचे वय १४ आणि १७ होते. गोळी लागल्यामुळे ८ जण जखमी झाले असून त्यामध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. मॅककेबे पुढे म्हणाले की, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना आरोपी विद्यार्थ्याने जाणूनबुजून निशाणा केले होते की अंदाधुंद गोळीबाराचे ते शिकार झाले हे अद्याप समजले नाही. सध्या याची चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, गोळी लागून घायळ झालेल्या ८ जणांपैकी २ जणांची सर्जरी करण्यात आली आहे. तर ६ जणांची प्रकृती स्थिर आहे. गोळीबार केलेल्या विद्यार्थ्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. शाळेत काही रिकामी काडतुसेही सापडली आहेत. त्यामुळे आरोपी विद्यार्थ्याने १५-२० वेळा गोळीबार केला असल्याचे समजले. त्याने एकट्यानेच हा गोळीबार केला होता. त्याने अशाप्रकारे गोळीबार का केला? याबाबत अजूनही तपास सुरू आहे. माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच २५ एजन्सी आणि ६० रुग्णवाहिका बचाव कार्यासाठी पोहोचले होते. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना त्वरित याबाबत माहिती देण्यात आली. मग शाळेतून सुरक्षित बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांजवळ सोडून एका सुरक्षित ठिकाणी ठेवले गेले.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Threat: दक्षिण आफ्रिकेतून नाही तर युरोपमधून पसरला ओमिक्रॉन; नवा खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -