घरताज्या घडामोडीउरलेले खाद्यतेल द्या, अन् बायोडिझेल घ्या ! तेलाचा वारंवार वापर टाळण्यासाठी IIP...

उरलेले खाद्यतेल द्या, अन् बायोडिझेल घ्या ! तेलाचा वारंवार वापर टाळण्यासाठी IIP चा पुढाकार

Subscribe

समोसे, छोले भटोरे, भजी, जिलेबी यासारखे पदार्थ बनवल्यानंतर उरणारे तेल आता पुन्हा वापरात आणायचा इकोफ्रेंडली पर्याय उपलब्ध झाला आहे. खाद्य तेलाचा पुर्नवापर टाळण्यासाठी एक पुढाकार घेण्यात आला आहे. उरलेल्या खाद्यतेलाच्या मोबदल्यात आता बायोडिझेलचा पर्याय उपलब्ध होणार आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने या खाद्यतेलाचा पुर्नवापर हा बायोडिझेलमध्ये करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आईपी आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पुढाकारातून या मोहिमेला सुरूवात ही चारधाम यात्रेच्या निमित्ताने होणार आहे. चारधाम यात्रेच्या मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तसेच खाद्यविक्रेत्यांकडून तेलाचा होणारा वापर पाहता याठिकाणी मोबाईल बायोडिझेल वॅन चालवण्यात येणार आहे. यात्रेकरूंना चांगल्या तेलातील पदार्थ उपलब्ध व्हावेत हा मोहिमेचा उद्देश आहे.

तेलाचा वारंवार वापर होत असल्याने त्याचे मानवी शरीरास होणारे अपाय समोर आले आहेत. त्यामुळे चारधाम सारख्या मोठ्या यात्रेत अशा गोष्टी टाळण्यासाठीच या मोबाईल वॅनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ तळलेले तेल घेऊन बायोडिझेल देण्यात येणार आहे. आयआयपीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ नीरज आत्रेय यांनी सांगितले की हरिद्वार, ऋषिकेश तसेच बद्रीनाथ अशा तिन्ही ठिकाणी मोबाईल वॅन नेण्यात येणार आहे.

- Advertisement -

रेस्टॉरंट, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडून एसडीसी फाऊंडेशनची टीम खाद्य तेल २० रूपये ते २५ रूपये प्रति लीटर दराने खरेदी करणार आहे. महत्वाचे म्हणजे या उरलेल्या खाद्यतेलातून काही तासातच बायोडिझेल तयार केले जाणे शक्य आहे. याचा वापर जनरेटरसारख्या वाहनात शक्य आहे. अवघ्या दोन तासांमध्ये वापरलेल्या खाद्यतेलातून बायोडिझेल बनवण्याची प्रक्रिया करणे शक्य आहे. त्याध्ये पाच लीटर उरलेल्या खाद्यतेलातून ४ लीटर बायोडिझेल तयार करणे शक्य आहे.

तयार झालेले बायोडिझेल हे ६८ रूपयांनी विक्री करणे शक्य आहे. महत्वाचे म्हणजे सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत हे बायोडिझेल अतिशय स्वस्त आहे. याच्या वापराची ट्रेनिंगही व्यापाऱ्य़ांना देण्यात येणार आहे. काशीपुर येथे ५० लीटर बायोडिझेल एकत्र तयार करण्यासाठीचा प्लान्ट लावण्यात येणार आहे. येत्या दिवसांमध्ये बायोडिझेल तयार करण्याचा डेमो देण्यात येणार आहे.

- Advertisement -

यात्रेच्या काळात खाद्य तेलाच्या पडताळणीसाठी अन्न सुरक्षा विभागाची मोबाईल टीमही तैनात करण्यात येणार आहे. या टीमच्या माध्मयातून ऑन द स्पॉट अशा भेटीतून खाद्यतेलाचा वापर कितीवेळा झाला आहे, याचीही पडताळणी होणार आहे. आयआयपीने यात्रेच्या मार्गावरील जिल्ह्यांना फ्राईंग ऑईल मॉनिटर देण्याची सुरूवात केली आहे.

एउएउएलआयने वापरलेल्या शिळ्या तेलाचा वापर रोखण्यासाठी अनेक कडक नियम केले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये समोसा, छोले भटोरे, भजी, जलेबी, पकोडा तयार करताना तेलाचा वारंवार असा वापर झाल्यास लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -