घरदेश-विदेशसपना चौधरी राजकारणात?

सपना चौधरी राजकारणात?

Subscribe

नुकतीच सपना चौधरीने काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सपना चौधरीने ही भेट घेतल्यानंतर तिला प्रसारमाध्यमांनी गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती केली.

बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेली सपना चौधरी आता एका नव्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. आता म्हणे सपना चौधरी राजकारणात येणार आहे का? आता सपना चौधरी राजकारणात का? असा प्रश्नही आहेच. पण हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी येत्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना दिसणारा आहे. तेही काँग्रेससाठी.

सपनाने घेतली सोनिया आणि राहुल यांची भेट

खरतरं सपना चौधरी ही काँग्रेससाठी काम करणार ही चर्चा रंगल्याचे कारणही खास आहे. नुकतीच सपना चौधरीने काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सपना चौधरीने ही भेट घेतल्यानंतर तिला प्रसारमाध्यमांनी गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी तिने मी राजकारणात येणार नसल्याचे स्पष्टीकरण तिने दिले आहे. हे स्पष्टीकरण देतानाचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

सोनियांच्या कामांमुळे प्रेरित

राजकारणातील प्रवेशाबाबत प्रश्न विचारल्यानंतर तिने या प्रश्नाला वेगळेच वळण दिले. ती म्हणाली, कोणाला भेटावेसे वाटले तर भेटू शकत नाही का? , सोनिया गांधींनी आतापर्यंत खूप चांगली काम केली आहेत. त्यांच्या कामामुळे मी प्रेरित झाले आहे. आणि कोणाला भेटण्यासाठी कोणते कारण हवे असे नाहीच ना ? मग हा प्रश्न का? असे तिने उत्तर दिले आहे. तिने जरी या राजकीय प्रवेशाच्या बातमीला नकार देताना प्रचाराच्या बातमीला तिने विरोध केला नाही, त्यामुळे ती पुढील काळात काँग्रेससाठी प्रचार करेल का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

कोण आहे सपना चौधरी ?

सपना चौधरी ही हरियाणामधील प्रसिद्ध स्टेज डान्सर आहे. तिची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. तेरी अखियोंका काजल हे हरियाणवी भाषेतले गाणे हे खूप प्रसिद्ध झाले होते. अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ती परफॉर्म करते. बिग बॉसच्या निमित्ताने ती घराघरात पोहोचली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -