घरताज्या घडामोडीHDFC, SBI Interest Rate : SBI, HDFC बँकेच्या FD व्याजदरात वाढ, ग्राहकांना...

HDFC, SBI Interest Rate : SBI, HDFC बँकेच्या FD व्याजदरात वाढ, ग्राहकांना होणार मोठा फायदा

Subscribe

देशातील सर्वात मोठी SBI आणि HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. खासगी क्षेत्रातील अव्वल स्थानावर असलेल्या एचडीएफसी आणि एसबीआय बँकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या दोन्ही बँकेने मुदत ठेवीवरील व्याजाचे दर वाढवले आहेत. दोन कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याज ५-१० बेसिस पॉइंटने वाढवण्यात आले आहेत. तसेच हे नवे व्याजदर १५ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या मुदत ठेवीवर विविध प्रकारचे व्याजदर लागू करते. दोन ते वर्षांच्या मुदत ठेवीवर ५.२० टक्के आणि २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ५.४५ टक्के व्याज मिळणार आहे. तसेच ५ ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ५.५० टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहे. ग्राहकांना व्याजदराचा फायदा कमी डिपोझिटवर २ कोटींपर्यंत होणार आहे.

- Advertisement -

एचडीएफसी बँक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीची सुविधा देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर अधिक व्याजही देते. ७ ते १० वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाचा दर २.५० टक्के ते ५.६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर मिळणारा व्याजदर ३ ते ६.३५ टक्क्यांदरम्यान आहेत.

कालावधी व्याज दर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर

७ ते १४ दिवस – २.५० टक्के ते ३ टक्के
१५ ते २९ दिवस – २.५० टक्के ते ३ टक्के
३० ते ४५ दिवस – ३ टक्के ते ३.५० टक्के
४६ ते ६० दिवस – ३ टक्के ते ३.५० टक्के
६१ ते ९० दिवस – ३ टक्के ते ३.५० टक्के
९१ दिवस ते ६ महिने – ३.५० टक्के ते ४ टक्के
१ वर्ष – ५ टक्के ते ५.५० टक्के
१ वर्ष १ दिवस ते २ वर्ष – ५ टक्के ते ५.५० टक्के
२ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष – ५.२० टक्के ते ५.७० टक्के
३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष – ५.४५ टक्के ते ५.९० टक्के
५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष -५.६० टक्के ते ५.३५ टक्के

- Advertisement -

हेही वाचा : International Flights: आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला परवानगी अपेक्षित, बैठक सत्र सुरू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -