घरताज्या घडामोडीतुमच्या वक्तव्यांसाठी कचऱ्याची टोपलीच योग्य --सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना सुनावले

तुमच्या वक्तव्यांसाठी कचऱ्याची टोपलीच योग्य –सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना सुनावले

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना नाव न घेता फटकारले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधातील सर्व प्रकरणे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवावी यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना नाव न घेता फटकारले आहे. मविआच्या प्रतिनिधींच्या वक्तव्यांमुळे आम्हांला काहीही फरक पडत नसून त्या वक्तव्यांसाठी कचऱ्याची टोपलीच योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे सिंग यांच्याविरोधातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करावी यावरील सुनावणी सुरू आहे . यावेळी न्यायालयाने राऊतांच्या वक्तव्यांचा हवाला दिला. मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने राऊत यांनी न्यायालयाकडून योग्य न्यायाची अपेक्षा नसल्याचे म्हटले होते. त्यावर आज न्यायालयाने म्हटले की मीडियात येणाऱ्या बातम्यांची आम्हांला चिंता नाही. परवा राज्य सरकारमधील एका नेत्याने असे वक्तव्य केले की त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा उरलेली नाही. पण त्यांच्या या वक्तव्यांमुळे आम्हांला काहीही फरक पडत नाही. कारण अशा वक्तव्यांसाठी कचऱ्याची टोपली हेच योग्य स्थान आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -