घरCORONA UPDATEघ्या आता! शोधकर्त्यांनीच बनवला Duplicate कोरोना व्हायरस

घ्या आता! शोधकर्त्यांनीच बनवला Duplicate कोरोना व्हायरस

Subscribe

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहाःकार माजला आहे. विविध देशातीलू शास्त्रज्ञ या आजारावरील लस शोधण्यामध्ये गुंतले आहेत. एकीकडे त्यांच्या संशोधनाला यश येत असल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे त्या औषधांनाही पर्याय उपलब्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लस आणि औषधांच्या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या थेरेपींवरही भर दिला जात आहे. अशातच शोधकर्त्यांनी नकली कोरोना व्हायरसच बनवला आहे. हा नकली व्हायरस आजार पसरवणारा नसल्याचे सांगितले जात आहे. तर आजाराला रोखणाऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

अमेरिकेतील संशोधकांनी एका प्रयोगशाळेत जेनेटिकली बदल करून फक्त प्रोटीनपासून हा व्हायरस बनवला आहे. जो कोरोनासारखाच दिसतो. वजनान हलका असलेला हा व्हायरस मात्र कोरोना पसरवत नाही. या नकली व्हायरसमध्ये माणसांच्या शरिरात कोरोनापासून लढण्यासाठीचे अँटीबॉडी निर्माण करण्याची क्षमता आहे. सांगितले जाते की, या व्हायरसचा वापर जगभरातील औषधं तसेच लसीवरील चाचण्यांसाठी करता येऊ शकतो.

- Advertisement -

या व्हायरसला वेसिकुलर स्टोमेटाइटिस व्हायरस (VSV) हे नाव देण्यात आले आहे. याला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी बनवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा व्हायरस स्वास्थ्य पेशींना वाढवण्याचे काम करतो. शरीरात बनणाऱ्या अँटीबॉडी त्याला टार्गेट करतात. या व्हायरसच्या माध्यमातून शरीरातील अँटीबॉडीजला कोरोनाशी लढण्यासाठी तयार केले जाईल.

हेही वाचा –

Bigg B : ‘… देवा मदतीला धाव!’, अमिताभ बच्चन यांना आठवले ‘ते’ दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -