घरदेश-विदेशतृतीयपंथीयांबद्दल 'ते' विधेयक चुकीचे - शशी थरूर

तृतीयपंथीयांबद्दल ‘ते’ विधेयक चुकीचे – शशी थरूर

Subscribe

तृतीयपंथीयांचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. या विधेयकाचा विरोध तृतीयपंथी संघटनांनी केला आहे. हे विधेयक चुकीचे असल्याचे ट्विट काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला आहे.

देशातील तृतीयपंथी विधेयकाला राज्य सभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता लोकसभेत त्यावर विचार करण्यात येत आहे. या विधेयकाला बदलून लोकसभेत एक वेगळेच विधायक तयार करण्यात आले आहे. या विधेयकाचा काही तृतीयपंथी संघटनांनी विरोध केला आहे. याविधेयकामध्ये काही चुकीच्या गोष्टी असल्याचे ट्विट काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. लोकसभेत सोमवारी हे विधेयक पास करण्यात आले होते. या विधेयकात काही त्रृती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तृतीयपंथीयांवर होणारे अन्याया विरोधात कोणता गुन्हा नोंदवणार असा प्रश्न केला जात आहे.

नेमके काय आहे विधेयक

या विधेयकानुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा फक्त महिला नोंदवू शकणार आहेत. बलात्कार, छळ किंवा लैंगिक अत्याचार सारखे गुन्ह्यांमध्ये फक्त महिला बळीतच गृहित धरण्यात येणार आहे. तृतीयपंथींना भिक मागणे किंवा इतर मार्गाने पैसे मिळवणे हे कायदेशीर गुन्हा होणार आहे. शशी थरूर यांनी अनेक मुद्यांवर त्रृटी काढल्या आहे.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनीही केला विरोध

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकाचा विरोध केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -