घरदेश-विदेशसियाचीनमध्ये हिमस्खलन; चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू

सियाचीनमध्ये हिमस्खलन; चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू

Subscribe

सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन गस्त घालणारे लष्कराचे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. यामध्ये ४ जवान शहीद झाले असून दोन पोर्टर ठार झाले आहेत. तर गस्तीपथकातील ८ जवान दबले गेले असून जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सियाचीनच्या उत्तरेकडील भागात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. दरम्यान, डोग्रा रेजिमेंटचे सहा जवान आणि दोन हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनास्थळी सैनिकांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. सियाचीन हे सर्वात उंची असून याठिकाणी शत्रूपेक्षाही येथे जवानांना वातावरणाशी सामना करावा लागतो.

- Advertisement -

२०१६ मध्येही घडली होती घटना

गेल्या काही दिवसांपासून या भागात तुफान बर्फवृष्टी होत आहे. त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच २०१६ मध्ये देखील याच भागात हिमस्खलनामुळे दहा जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी लान्सनायक हणमंथाप्पा हे तब्बल सहा दिवसांनतर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जीवंत आढळले होते. त्यांना तातडीने दिल्लीत आणण्यात आले मात्र, तिथे रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – एक डिसेंबरपासून वोडाफोन आयडियाचे नवे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -