घरदेश-विदेशSidhu Moose Wala murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातील आरोपींचे सलमान खानशी कनेक्शन

Sidhu Moose Wala murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातील आरोपींचे सलमान खानशी कनेक्शन

Subscribe

गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलने 30 गोळ्या झाडण्यात आल्या. मूसेवालाने या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती.

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी आज सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येच्या प्राथमिक तपासात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर येते. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही.के. भावरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सिद्धू मूसेवाला हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडास्थित गँगस्टर लकी उर्फ गोल्डी ब्रार यांचा थेट सहभाग असल्याचे सांगितले आहे. मात्र आता सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातील लॉरेन्स बिश्नोई कोण होता आणि आरोपींचे सलमान खानशी कनेक्शन काय संबंध आहेत जाणून घेऊ…

काय होते सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईचे कनेक्शन?

ही गोष्टी 2018 सालची आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असताना बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वास्तविक त्या काळात सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. यावेळी अभिनेता असीनसोबत ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. यावेळी गँगस्टर लॉरेन्सने त्याच्या साथीदारांसह अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याची संपूर्ण योजना आखली.

- Advertisement -

पुढे काय झाले…

लॉरेन्स बिश्नोई योजना बनवताना ज्या शस्त्रास्त्रांबद्दल बोलला त्यांची व्यवस्था त्याला करता आली नाही. त्यामुळे गँगस्टरचा प्लॅन फसला आणि सलमान खानचा जीव वाचला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई सलमान खानवर नाराज होता. काळवीटाची शिकार केल्याबद्दल तो सलमान खानवर संतापला होता.

सिद्धू मूसेवाला याची पंजाबमधील मानसा येथे एसयूव्हीमध्ये प्रवास करत असताना गोळ्या झाडण्यात आल्या. गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलने 30 गोळ्या झाडण्यात आल्या. मूसेवालाने या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

पंजाबचे पोलीस प्रमुख व्ही.के.भावरा यांनी ही हत्या परस्पर वैमनस्यातून झाल्याचे दिसते. ही घटना टोळीयुद्धातील असल्याचे दिसते, असे पत्रकारांना सांगितले. गायक मूसेवालाची मॅनेजर शगुनप्रीतचे नाव गेल्या वर्षी तरुण अकाली नेता विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येप्रकरणी आले होते. यानंतर शगुनप्रीत ऑस्ट्रेलियाला पळून गेली होती. पोलीस प्रमुखांनी सांगितले की, मिद्दुखेडा येथील हत्येचा सूड म्हणून सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आल्याचे दिसते.


Sidhu Moose Wala च्या मृत्यूच्या तारखेचं ‘या’ गाण्यांशी खास कनेक्शन? कसे ते वाचा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -