घरताज्या घडामोडीSindhutai Sapkal : सिंधुताई समाजसेवेसाठी स्मरणात राहतील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Sindhutai Sapkal : सिंधुताई समाजसेवेसाठी स्मरणात राहतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संपूर्ण जगभरातून या सिंधुताई सकपाळ यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्वीट् करत शोक व्यक्त केला आहे.

अनाथ बालकांसाठी सेवाकार्य करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे काल मंगळवारी ४ जानेवारीला निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संपूर्ण जगभरातून या सिंधुताई सकपाळ यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्वीट् करत शोक व्यक्त केला आहे.

डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकले आहेत. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्येही खूप काम केले. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे . त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.ओम शांती,असे ट्विट् करत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

डॉ सिंधुताई सपकाळ यांचे जीवन हे धैर्य, समर्पण आणि सेवेची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी अनाथ, आदिवासी आणि उपेक्षित लोकांवर प्रेम केले आणि त्यांची सेवा केली. 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, त्यांनी अविश्वसनीय धैर्याने स्वतःची कथा लिहिली. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि अनुयायांप्रती संवेदना व्यक्त करतो,असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा शोक व्यक्त केला आहे.’ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला.समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती’, असे ट्विट् करत श्रध्दांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी दु:खद आहे. अनेक अनाथ मुलांची माय झालेल्या सिंधूताईंचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सिंधूताईंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली,असे ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

अनाथांची माय हरपली!अनाथांसाठी संपूर्ण आयुष्यभर सेवाकार्य करणाऱ्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांंच्या निधनाचं वृत्त हे मनाला चटका लावणारं आहे.आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!,असे ट्विट करत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

 


हेही वाचा – sindhutai sapkal : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -