घरCORONA UPDATECorona Update : देशात आतापर्यंत १४ लाख ८० हजार ८८५ रुग्णांना मिळाला...

Corona Update : देशात आतापर्यंत १४ लाख ८० हजार ८८५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

Subscribe

देशात एक दिवसात ६४ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ८६१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २१ लाख ५३ हजार ०११ पैकी ६ लाख २८ हजार ७४७ इतक्या अॅक्टिव्ह केसेस असून यामध्ये आतापर्यंत १४ लाख ८० हजार ८८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४३ हजार ३७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५८, ठाणे २१, वसई विरार मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १२, मीरा भाईंदर ९, रायगड ९, नाशिक ८, पुणे ४७, पिंपरी चिंचवड २०, सोलापूर ७, कोल्हापूर ९ यांचा समावेश आहे. २७५ मृत्यूंपैकी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू ठाणे ७, पुणे ६, पालघर ४, रायगड २, जालना २, नाशिक १, जळगाव १, सांगली १ आणि रत्नागिरी १ असे आहेत. आज ११,०८१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत ३,३८,३६२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा –

Sushant Sucide Case : मुंबई पोलिसांनी तपास लांबवला – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -