घरताज्या घडामोडीराष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूजा; सोनिया गांधींचा निर्णय

राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूजा; सोनिया गांधींचा निर्णय

Subscribe

नेट्टा डिसूजा यांच्याकडे राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली

काँग्रेसमधील राजनैतिक संकट संपण्याचं नाव घेत नाही आहे. काँग्रेसचा जनाधार कमी होत असून पक्षात उलथापालथ होत असल्यामुळे राजकीय पक्षसुद्धा खिळखिळा झाला आहे. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे रिक्त जागेवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेट्टा डिसूजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुष्मिता देव यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन टीएमसीमध्ये प्रवेश केल्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस सोडणाऱ्या युवा नेत्यांच्या यादीत आता सुष्मिता देव यांचं नाव आलं आहे. सुष्मिता देव काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय होत्या. सुष्मिता देव या मागील काही काळापासून नाराज असल्याची चर्चा होती. असाम विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान सुष्मिता देव काँग्रेसला रामराम करणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना सुष्मिता देव यांनी दुजोरा दिला नाही. अखेर सोमवारी सुष्मिता देव यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केलाय, टीएमसीमध्ये त्यांना त्रिपुराच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नेट्टा डिसूजा यांची नियुक्ती

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेट्टा डिसूजा यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला काँग्रेसकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. नेट्टा डिसूजा यांच्याकडे राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत त्या काम करत राहतील असे प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेतृत्वाशी नाराजी नाही – सुष्मिता देव

काँग्रेसला सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केल्यावर सुष्मिता देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाशी कोणतीही नाराजी नाही आहे. काँग्रेससोबत ३० वर्षांचा राजकीय प्रवास केला. काँग्रेसकडून अनेकवेळा संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने काम करण्याची संधी दिली परंतू काही कामात काही चूका झाल्या असल्यास सोनिया गांधी माफ करतील. काँग्रेस सोडण्यामागे नाराजी नाही. राजीनामा देण्यासोबत सोनिया गांधींचे आभार व्यक्त केले आहेत अशी प्रतिक्रिया सुष्मिता देव यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -