घरदेश-विदेशसोन्यात स्वस्तात गुंतवणुक करण्याची सुवर्ण संधी, २.५ टक्के रिटर्नची गॅरेंटी

सोन्यात स्वस्तात गुंतवणुक करण्याची सुवर्ण संधी, २.५ टक्के रिटर्नची गॅरेंटी

Subscribe

केंद्र सरकारने सोव्हेरन गोल्ड बाँड योजनेची दुसरी सीरिज आज बाजारात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात सोन्यात स्वस्तात गुंतणुकीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या सोव्हेरन गोल्ड बाँड (SGB) योजनेचा दुसरी सीरिज आज म्हणजेच २४ मेपासून गुंतवणूकीसाठी सुरु करण्यात आहे. त्यामुळे ग्राहक २४ मेपासून ते २८ मेपर्यंत गुंतवणूकदार यात गुंतवणूक करु शकणार आहेत. विशेष म्हणजे, सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) ची पहिल्या सीरिजमधील गुंतवणूक गेल्या आठवड्यात म्हणजेच २१ मे रोजी बंद झाली. सॉव्हेरन गोल्ड बाँडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला दरवर्षी २.५ टक्के व्याज मिळते.

यात सोन्याचा दर नेमका किती?

सन २०२१- २२ या आर्थिक वर्षातील सॉव्हेरन गोल्ड बाँडचा दुसऱ्या सीरिजमधील सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ४८४२ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या सॉव्हेरन गोल्ड बाँडमध्ये डिजिटल स्वरुपात पेमेंट केल्यास गुंतवणुकदारास प्रति ग्रॅममागे ५० रुपयांची सूट मिळेल. म्हणजे ऑनलाइन पेमेंटने पैसे भरल्यास सोन्याची गुंतवणूक प्रति ग्रॅम ४,७९२ रुपये होईल. सोने बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ४,८५५ रुपयाच्या आसपास आहे. परंतु पहिल्या सीरिजमध्ये १७ ते २१ मेदरम्यान गोल्ड बाँडचा दर ४,७७७ रुपये प्रति ग्रॅम होता.

- Advertisement -

सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?

सॉव्हेरन गोल्ड बाँड हे रिझर्व्ह बँक किंवा अर्थमंत्रालयाकडून बाजारात आणसले जाते. सॉव्हेरन गोल्ड बाँडमध्ये किमान १ ग्रॅमपासून ते कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदारांने ते बाँड ऑनलाईन किंवा रोखीने खरेदी करावे लागते त्याबदल्यात समान किंमतीचा सॉव्हरेन गोल्ड बाँड ग्राहकाला दिला जातो. परंतु हा बाँड प्रत्यक्ष सोने स्वरुपात मिळत नसून त्याऐवजी सर्टिफिकेटच्या रुपात दिला जातो. हा सॉव्हेरन गोल्ड बाँड आठ वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी असतो. परंतु तुम्हाला ५ वर्षांनेही या बाँडमधून बाहेर पडता येते. म्हणजेच यामध्ये तुम्हाला सोने मिळणार नाही, त्याऐवजी सरकार तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीच्या रकमेच्या तुलनेत बाँड देते.म्हणजे सरकराने सध्याच्या बाजारभावाप्रमाणे निश्चित केलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करायची असते आणि आठ वर्षानंतर त्यावेळेस असलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तुम्हाला दिले जाते. म्हणजेच

सॉव्हेरेन गोल्डवरील व्याज आणि फायदा

सॉव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज मिळते. हे व्याज सहामाही स्वरुपात दिले जाते.
सोव्हेरन गोल्ड बॉंडवर मिळणारे व्याज हे प्राप्तिकर नियम १९६१ नुसार करपात्र असते. मात्र सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात करवजावट मिळते. याशिवाय सॉव्हेरन गोल्ड बॉंडवर तुम्हाला बॉंड तारण ठेवून कर्जदेखील मिळते. कर्जाचे सोन्याच्या मूल्याशी असलेले गुणोत्तर हे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सोन्यावर दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीच्या सूचनांप्रमाणे ठरवले जाते. सोन्यातील गुंतवणूक आणि तीदेखील सरकारच्या बॉंडमधील त्यामुळे सॉव्हेरन गोल्ड बॉंड ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते आणि शिवाय परतावादेखील चांगला मिळतो. याशिवाय सोन्याचा दर वाढत असताना तुमची गुंतवणूक वाढते. सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करणे भौतिक सोन्यापेक्षा सोपे आणि सुरक्षित आहे. त्यात सोनं ठेवण्यासारख्या सुरक्षेची चिंता नाही. हे बाँड पेपर आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत. ज्यामुळे आपल्याला भौतिक सोन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च सहन करावा लागत नाही.

- Advertisement -

सॉव्हेरेन गोल्ड बाँड कुठे खरेदी करता येईल?

सॉव्हेरेन गोल्ड बाँडची खरेदी शेड्युल्ड कमर्शियल बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि, पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी केली जाते. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रत्यक्ष शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता.


भारीचं हौस! लॉकडाऊनच्या भीतीने जोडप्याने चक्क उडत्या विमानात बांधली लग्नगाठ


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -