घरदेश-विदेशकोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान पठ्ठ्याने लावला कडूनिंबाच्या पानांचा मास्क! व्हायरल होतोय व्हिडीओ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान पठ्ठ्याने लावला कडूनिंबाच्या पानांचा मास्क! व्हायरल होतोय व्हिडीओ

Subscribe

देशभरात सध्या कोरोनाने कहर केला असून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वच तज्ज्ञांनी मास्कचा वापर आवर्जून करणं असे सांगितले आहे. बरेच लोक या मास्क वापरून कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसताय. कर काही लोकं अद्याप करताना दिसत नाही तर काहींना अनोखा मार्ग शोधून मास्क घालणं पसंत केलं आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यात राहणारा महेंद्र सिंग यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्याचा लक्षवेधी मास्क. महेंद्र सिंग यांचा हा मास्क सर्वसाधारण मास्क सारखा नाही. तर तो कडुलिंबाच्या पानांपासून बनलेला आहे. इतकेच नाही तर हे कडुलिंबाचे पानं ठेवण्यासाठी ज्याचा मास्क म्हणून वापर केला आहे. ते जनावरांच्या तोंडाला बांधण्यासाठी वापरले जाते.

हा व्हायरल होणारा व्हिडिओ लखीमपूर जिल्ह्यातील बगरेठी गावातील आहे. या गावात महेंद्र सिंग नावाच्या पठ्ठ्याने एक अनोखा मास्क लावण्याने त्यांची सर्वत्र चर्चा आहे. महेंद्र सिंगला गावकऱ्यांनी जेव्हा या मास्क बद्दल विचारले तेव्हा त्याने हा मास्क त्याला सरकारी रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने दिला असल्याचे सांगितले आहे. या मास्कमध्ये कडुलिंबाची पाने लावल्यास फायदा होईल असे त्या अधिकाऱ्याने महेंद्रला सांगितले. महेंद्र यांना हा मास्क वापरल्याने कोणताही त्रास होत नसून श्वासही उत्तम घेता येतो, असेही या अधिकार्याने सांगितले.

- Advertisement -

पोलिस तपासणी करत असताना त्यांच्याकडे कपड्याचा मास्क नसल्याचे महेंद्रसिंग यांनी सांगितले पण नंतर त्यांनी हा मास्क वापरण्यास सुरूवात केली. कोरोनाच्या वाढत्या परिस्थिती महेंद्रसिंग गावाबाहेर पडले की, त्याच्या मागे सर्व गावातील लोकं जमा होतात आणि त्याच्याबद्ल आश्चर्य व्यक्त करतात. यासह कडुनिंब हे औषधाचे वनस्पती आहे, यामुळे बरेच आजार बरे होतात. हा मास्क लावल्याने त्यांना श्वास घेण्यासही कोणताही त्रास जाणवत नाही आणि स्वच्छ हवा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -