घरदेश-विदेशस्पाईसजेटच्या दिल्ली - नाशिक विमानाच्या ऑटो पायलटमध्ये बिघाड; अर्ध्यातून विमान परतले माघारी

स्पाईसजेटच्या दिल्ली – नाशिक विमानाच्या ऑटो पायलटमध्ये बिघाड; अर्ध्यातून विमान परतले माघारी

Subscribe

दिल्लीहून नाशिककडे निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानातील ऑटो पायलटमध्ये बिघाड झाल्याने विमान अर्ध्यातून परतावे लागल्याची घटना घडली, अशी माहिती विमान वाहतूक नियामक DGCA ने ही माहिती दिली आहे. दरम्यान या स्पाईसजेटच्या बोईंग 737 विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले आहे.

डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्पाईसजेट बी737 विमान व्हीटी-एसएलपी जे दिल्लीहून नाशिकला निघाले होते, मात्र अचानक फ्लाइट एसजी-8363 ला ऑटो पायलटमध्ये बिघाड झाला ज्यामुळे विमान अर्ध्यातून दिल्ली विमानतळावर आणावे लागले. असे DGCA अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -


गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या चढ्या किमती आणि रुपयाची घसरण यामुळे आर्थिक गडबड असताना स्पाइसजेटच्या अनेक विमानांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असे असतानाही स्पाइसजेटच्या विमानांत त्रुटी आढळण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.


शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची बॅनरबाजी, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातही फूट?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -