घरदेश-विदेशही श्रीलंकेची संसद का कुस्तीचा आखाडा; व्हिडिओ व्हायरल!

ही श्रीलंकेची संसद का कुस्तीचा आखाडा; व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

श्रीलंकेच्या संसदेत खासदारांनी राडा केला. राजपक्षेंचे समर्थक असलेल्या खासदारांनी थेट स्पीकर यांच्यावर पाणी बॉटल आणि पुस्तकं फेकले. जवळपास अर्धा तास सुरु असलेल्या या नाटकबाजीनंतर जयसूर्या यांनी संसदेचे कामकाज तहकूब केले.

श्रीलंकेच्या संसदेमध्ये खासदारांनी राडा केल्याची घटना घडली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दावा केला होता की, स्पीकरला मला पदावरुन काढण्याचा काहीच अधिकार नाही. संसदेने राजपक्षेच्याविरोधात अविश्वास ठराव पारित केला होता. जेव्हा पुन्हा संसद पुन्हा बोलावण्यात आली. तेव्हा संसदेचे स्पीकर करु जयसूर्या यांनी सांगितले की, देशामध्ये कोणाचेच सरकार नाही. इथे यावेळी कोणीच पंतप्रधान नाही. जरी राष्ट्रपतींकडून नियुक्त झालेले राजपक्षे असेल किंवा त्यांचे विरोधी विक्रमसिंघे असतील. त्यानंतर राजपक्षे आणि विक्रमसिंघेचे समर्थक आप-आपसात संदेमध्येच भिडले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना मारहाण केली.

- Advertisement -

स्पीकरला हा अधिकार नाही

राजपक्षे यांनी स्पीकरचे मत नाकारत सांगितले की, कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्याचा निर्णय ध्वनिमताने घेतला जाऊ शकत नाही. त्याचसोबत स्पीकरला पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांना नियुक्त करणे आणि काढूण टाकण्याचा काहीच अधिकार नाही. राजपक्षेने आरोप केला आहे की. स्पीकर पक्षपात करत आहे. स्पीकर युनाइटेड नॅशनल पार्टीचे प्रतिनिधित्व करत आहेत. ज्याचे नेतृत्व पंतप्रधान पदावरुन काढलेले विक्रमसिंघे करत आहे. या राजकिय संकटाला दूर करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे पुन्हा मतदान घेतले जावे असे मत राजपक्षे यांनी मांडले आहे.

खासदार एकमेकात भिडले

विरोधकांनी राजपक्षेंच्या वक्तव्यानंतर मतदान करण्याची मागणी केली तर काही खासदार वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ३५ ते ३६ खासदार एकमेकात भिडले. मारहाणी दरम्यान काही खासदार जमिनीवर पडले. राजपक्षेंचे समर्थक असलेल्या खासदारांनी थेट स्पीकर यांच्यावर पाणी बॉटल आणि पुस्तकं फेकले. जवळपास अर्धा तास सुरु असलेल्या या नाटकबाजीनंतर जयसूर्या यांनी संसदेचे कामकाज तहकूब केले.

- Advertisement -

असे सुरु झाले राजकिय संकट

श्रीलंकेमध्ये राजकीय संकटाची सुरुवात २६ ऑक्टोबरला झाली. त्यावेळा राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान विक्रमसिंघे यांचे सरकार बरखास्त केले आणि त्यांच्या जागी महिंद्रा राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून हा वाद सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -