घरदेश-विदेशSBI चे ग्राहक कितीही वेळा काढू शकतात एटीएममधून पैसे

SBI चे ग्राहक कितीही वेळा काढू शकतात एटीएममधून पैसे

Subscribe

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता एसबीआयचे ग्राहक कितीही वेळा विनामूल्य एटीएममधून पैशाचा व्यवहार करू शकणार आहेत.

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता एसबीआयचे ग्राहक कितीही वेळा विनामूल्य एटीएममधून पैशाचा व्यवहार करू शकणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना मर्यादीत स्वरूपात विनामूल्य एटीएमचा व्यवहार करता येत होता. मात्र यापुढे ही मर्यादा राहणार नाही. परंतू या सेवेला लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बॅंकेच्या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

वाचा : एसबीआयने घेतला हा निर्णय, आता इराणची गोची!

- Advertisement -

किमान इतके पैसे अकाउंटमध्ये असावेत

जर तुम्हाला कितीही वेळा विनामूल्य एटीएमचा व्यवहार करायचा असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये ठरावीक रक्कम असणे आवश्यक आहे. महिन्याला किमान १ लाख रुपये अकाउंटमध्ये असल्यास या सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येईल. ही सुविधा स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्रुप (SBG) च्या एटीएममधून कितीही वेळा विनामूल्य मिळू शकते. आरबीआयने एसबीआयला याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. यानुसार एसबीआय त्यांच्या ग्राहकांना दरमहा एक ठराविक संख्येमध्ये विनामूल्य एटीएमचा व्यवहार करण्याची सुविधा देतील.

वाचा : एसबीआयच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना झटका

- Advertisement -

एटीएम व्यवहाराची ही आहे मर्यादा

आजवर एसबीआयच्या खातेदारकांना मेट्रोसिटीमध्ये ८ वेळा विनामूल्य एटीएम व्यवहार करण्याची सुविधा होती. यापैकी ५ व्यवहार एसबीआय एटीएम तर उर्वरीत ३ व्यवहार अन्य बॅंकेच्या एटीएममधून करता येत होते. तर मेट्रो व्यतिरीक्तच्या भागांमध्ये ही मर्यादा १० वेळा विनामूल्य एटीएम व्यवहाराची होती. ही मर्यादा संपल्यास ५ रुपये जीएसटीपासून २० रुपयांपर्यंतचा दंड लागू करण्यात आला होता.

वाचा : काय म्हणताय? एफडीवर जास्त व्याज !!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -