गुजरातमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; ओवैसी निशाण्यावर असल्याचा वारीस पठाणांचा आरोप

AIMIM प्रमुख गुजरातचे प्रदेशाध्यक्ष साबीर काबलीवाला आणि पक्षाच्या इतर नेत्यांसह अहमदाबादहून सुरतला 'वंदे भारत एक्स्प्रेस'मधून प्रवास करत होते.

गुजरातमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी ज्या ट्रेनमध्ये बसले होते त्या ट्रेनच्या खिडकीवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी ओवैसी हे आरोपींचे लक्ष्य असल्याचा आरोप केला. ही घटना घडली तेव्हा AIMIM प्रमुख गुजरातचे प्रदेशाध्यक्ष साबीर काबलीवाला आणि पक्षाच्या इतर नेत्यांसह अहमदाबादहून सुरतला ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधून प्रवास करत होते. (Stone pelting on Vande Bharat Express in Gujarat; Waris Pathans allege that Owaisi is on target)

ओवेसींवर हल्ल्याचा दावा
ही दगडफेक झाल्यानंतर ट्रेनच्या खिडकीच्या काचा देखील तुटल्या . या तुटलेल्या काचांची छायाचित्रे शेअर करत AIMIM नेते वारिस पठाण यांनी ट्विट केले की, असदुद्दीन ओवैसी , साबीर काबलीवाला आणि आमची टीम अहमदाबादहून सुरतला ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ट्रेनमधून प्रवास करत असताना काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. काचा देखील फोडल्या यासोबतच ओवेसींवर ही दगडफेक झाली असल्याची माहीत देखील वारीस पठाण यांनी दिली.

दोन वेळा दगडफेक
गुजरातमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना पठाण यांनी असा दावा केला की, असदुद्दीन ओवैसी ज्या कोचमध्ये बसले होते, तिथे दोनदा दगडफेक करण्यात आली होती. ते म्हणाले की, आम्ही आज अहमदाबाद ते सुरत असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. आम्हाला जय याठिकाणी पोहोचायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी 20 ते 25 किमी अंतरावर असताना दगडफेक झाली ज्यामुळे खिडकीच्या काचा तुटल्या. या प्रकरणी वारीस पठाण म्हणाले की, दगडफे केल्याने तुम्ही कधीच आमच्या हक्कासाठी आमचा आवाज दाबू शकणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 सप्टेंबर रोजी लॉन्च केली वंदे भारत एक्सप्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी 30 सप्टेंबर २०२२ रोजी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. आगामी निवडणुका लक्षात घेऊन ओवेसी गुजरातच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात 1 आणि 5 डिसेंबरला विधानसभा निवडणुका होणार असून, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


हे ही वाचा – माझ्या उजव्या पायाला तीन गोळ्या लागल्या, इम्रान खान यांचा दावा