घरताज्या घडामोडीनिवडणूक आयोगाचा भाजपला दणका; अनुराग ठाकूर प्रचारातून आऊट

निवडणूक आयोगाचा भाजपला दणका; अनुराग ठाकूर प्रचारातून आऊट

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत वादग्रस्त विधान केल्यामुळे केंद्रीय अनुराग ठाकूर आणि भाजप नेते परवेश साहिब सिंग वर्मा यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या दोघांची नावे निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने भाजपला दिले आहेत. ‘देश के गद्दारो को गोली मारो…’ या वादग्रस्त घोषणाबाजीमुळे निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नोटीस बजावली आहे. ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने या नोटीसचे उत्तर देण्याची मुदत दिली आहे.

- Advertisement -

नक्की काय घडलं?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. ज्यावर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रिपोर्ट मागविला आहे. रिठाला येथील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी निवडणुकीच्या सभेत आलेल्या लोकांना ‘गद्दारो को गोली मारो’ अशा प्रतिघोषणा दिल्या.

विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांना निवडणूक प्रचारातून वगळण्यात आले आहे. कपिल मिश्रा यांनी असं ट्विट केलं होत की, ‘८ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.’ यामुळे निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना ४८ तासांसाठी प्रचार करण्यास मनाई केली होती. दिल्लीची विधानसभा निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘जागेचे नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत, मी तिथे येण्यास तयार’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -