घरताज्या घडामोडीप्रशांत किशोर म्हणजे 'करोना व्हायरस'- अजय आलोक यांची टीका

प्रशांत किशोर म्हणजे ‘करोना व्हायरस’- अजय आलोक यांची टीका

Subscribe

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यांसह विविध मुद्द्यांवरून जदयूचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात जुंपली आहे. यात आता जदयूचे नेते अजय आलोक यांनीही उडी घेतली असून प्रशांत किशोर यांची तुलना थेट ‘करोना व्हायरस’बरोबर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर नीतिश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उगारत आहेत. यामुळे जदयू नेते त्यांच्यावर नाराज आहेत. याचपार्श्वभूमीवर अजय आलोक यांनी प्रशांत किशोर य़ांना लक्ष्य केलं. प्रशांत किशोर हे विश्वासार्ह नाहीत. त्यांना मोदी आणि नीतिश यांचाही विश्वास जिंकता आलेला नाही. ते ‘आप’साठी काम करतात. राहुल गांधींबरोबर चर्चा करतात. ममता दीदींबरोबर बैठका घेतात. कोण त्यांच्यावर विश्वास ठेवणार. आम्हाला तर आनंदच होतोय की हा करोना व्हायरस आम्हांला सोडून जात आहे. तो आता वाटेल तिथे जाऊ शकतो. असे आलोक यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

प्रशांत किशोर सातत्याने टि्वटरवरून सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) वर पक्षाने व्यक्त केलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभारत आहेत. तसेच दिल्लीमध्ये भाजप आणि जदयूच्या युतीवरही किशोर यांनी आक्षेप घेतला. याबद्दल नीतिश कुमार यांना विचारले असता त्यांनी ज्याला काही टि्वट करायचे असेल तर करू द्या, ज्याला पक्ष सोडून जायचे असेल तो जाऊ शकतो असे बोलून किशोर यांना बाहेरचा रस्ताच दाखवला होता. तसेच अमित शाह यांच्या सांगण्यावरूनच किशोर यांना पक्षात घेतले होते. त्यांना आता जायचे असेल तर ते जाऊ शकतात असेही म्हटले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनीही पलटवार करत नितिश यांच्यावरच विश्वास नसल्याचे म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -