घरताज्या घडामोडीकडक उन्हात कोरोनाचा धोका वाढला; रिसर्च

कडक उन्हात कोरोनाचा धोका वाढला; रिसर्च

Subscribe

कडक उन्हात कोरोनाचा धोका वाढला असल्याचे एका रिसर्चमधून समोर आले आहे.

देशात कोरोनाने अक्षरश: कहर केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असे बोले जात होते की, उन्हाळ्यात गर्मीमुळे कोरोना नष्ट होण्यास मदत होणार आहे. मात्र, असे अद्याप घडलेले नाही. तर आता कडक उन्हात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ‘जियोग्राइकल अॅनालिसिस’च्या अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासामध्ये असे नोंदवले गेले आहे की, कडक ऊन पडल्यावर मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे या कडक उन्हात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने वाढत असल्याची शक्यता अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढतोय

कॅनडा मॅकमास्टर युनिवर्सिटीच्या नेतृत्त्वानुसार करण्यात आलेल्या अभ्यासात वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या ही पावसापेक्षा उन्हाळ्यात अधिक वाढली आहे. कारण पावसाच्या दिवसात लोक बाहेर कमी प्रमाणात पडतात आणि उन्हाळ्यात अधिक प्रमाणात घराच्या बाहेर पडतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ आहे, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

- Advertisement -

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ८६ हजार ५८९ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ३७ हजार ४४८ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ४१ हजार २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – घोडेबाजाराच्या भीतीने राजस्थान कॉंग्रेसने आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -