घरताज्या घडामोडीसेक्स गुलाम बनवण्यासाठी घराघरात जाऊन मुली व महिलांना उचलतोय तालिबान

सेक्स गुलाम बनवण्यासाठी घराघरात जाऊन मुली व महिलांना उचलतोय तालिबान

Subscribe

तालिबान्यांचा खरा क्रूर चेहरा जगासमोर आला

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांचा जोश अधिक वाढला आहे. सेक्सगुलाम बनवण्यासाठी घरा घरात घुसून लहान मुली आणि महिलांना उचलण्यास तालिबान्यांनी सुरुवात केली आहे. (Taliban going door to door and drag little girls and women to make them sex slaves)  यामुळे एकीकडे जगासमोर अफगाणी महिलांना सन्मानाने जगू देण्याचा दावा करणाऱ्या तालिबान्यांचा खरा क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.

‘द सन’ या वेबसाईटवर तालिबान्यांच्या अत्याचाराचा लेखाजोगाच मांडण्यात आला आहे. अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्याआधी आणि नंतरही तालिबान्यांचे महिलांवरील अत्याचार सुरूच असल्याचे यात सांगण्यात आले आहे. तालिबानी नेते अफगाणि तरुणींचे अपहरण करत असून निकाहच्या नावाखाली त्यांना सेक्सगुलाम बनवत आहेत. तालिबान्यांचे हे कृत्य इराक आणि सिरियामधील ईसीस या क्रूर दहशतवादी संघटनेशी मिळते जुळते असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपासून ज्या भागांवर तालिबान कब्जा करत होते त्या भागातील १५ वर्षांवरील मुली व ४५ वर्षांच्या आतील विधवा महिलांच्या नावाची यादी तालिबान्यांनी मौलवींकडून मागितली होती. त्यानंतर घराघरात घुसून तालिबान्यांनी या अल्पवयीन मुली आणि महिलांचे अपहरण केले . तालिबानी सैनिकांबरोबर निकाहच्या नावाखाली या मुली व महिलांना सेक्सगुलाम बनवण्यात आले आहे. तसेच काबुलवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच त्यांच्या ताब्यात आल्याने तालिबान्यांचा महिलांवरील अत्याचारही वाढला आहे.


हेही वाचा – अफगाणिस्तानची महिला गव्हर्नर सलिमा मजारी तालिबान्यांच्या ताब्यात

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -