घरदेश-विदेश१६ ते १८ वयोगटातील युवकांनाही मिळणार दुचाकीचे लायसन्स?

१६ ते १८ वयोगटातील युवकांनाही मिळणार दुचाकीचे लायसन्स?

Subscribe

वय वर्षे १६ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींना दुचाकी चालवताना आपण बऱ्याचदा बघतो. या वयात दुचाकी चालवणं योग्य की अयोग्य यावर लोक आपापल्या दृष्टिकोनातून मतं देखील मांडत असतात. मात्र आता या वयोगटातील मुला-मुलांसाठी शासनाकडून दुचाकी लायसन्स मंजूर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकार १६ ते १८ वर्षे वयोगटातील युवकांआता १६ ते १८ वयोगटातील युवकांना मिळणार दुचाकीचे लायसन्स ?
ना १०० सीसी क्षमतेची नॉन गिअर दुचाकी चालवण्यासाठी लायसन्स देण्यात यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव तयार करत असल्याचे समजते आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव याआधी जून २०१६ मध्येही करण्यात आला होते. आपल्याकडे सध्या प्रचलित असलेल्या कायद्यानुसार मात्र १६ ते १८ या वयोगटातील तरुणांना दुचाकी चालवण्यासाठी परवानगी नाही.

- Advertisement -

केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार, १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना ५० सीसी क्षमतेखालील नॉन गिअर स्कूटर चालवण्यासाठीची परवानगी आहे. मात्र भारतात अशा प्रकारच्या ५० सीसी क्षमतेच्या दुचाकी अद्याप उपलब्ध नाहीत.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांसाठी हिरव्या रंगाच्या रजिस्ट्रेशन प्लेट्सची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये खासगी गाड्यांसाठी पांढऱ्या तर कमर्शिअल वाहनांसाठी पिवळ्या रंगातील नंबर प्लेट्स असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -