घरफिचर्स७३व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दर्जेदार चित्रपटांचं स्क्रीनिंग!

७३व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दर्जेदार चित्रपटांचं स्क्रीनिंग!

Subscribe

चित्रपटसृष्टी आणि ग्लॅमर जगतात ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ७3 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल ८ मे पासून सुरु झाला असून, १९ मे रोजी याची सांगता होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हटलं की रेड कार्पेटवर हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांच्या अदा. यंदाच्या कानमध्ये भारतीय अभिनेत्रींची कोणती अदा पाहायला मिळते याकडेच सध्या सर्वांच्या नजरा आहेत. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे या फेस्टिव्हलमध्ये कोणते चित्रपट पाहता येतील.
यावर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणते चित्रपट धुमाकूळ घालणार आहेत याचा एक आढावा –

१) एव्हरीबडी नोज

- Advertisement -

इराणी चित्रपट निर्माता असगर फरहादी दिग्दर्शित एव्हरीबडी नोज या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली आहे. नुकतीच अमेरिकन क्राइम स्टोरी मधील दोनाटेला व्हर्सेस म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्जेंटिनातील पती आणि मुलांसह माद्रिदबाहेर आपल्या मूळ गावी परत येते. ही त्यांची गावाला दिलेली भेट त्यांच्यासाठी काही अनपेक्षित घटना घेऊन येते, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलते. अजूनही हा चित्रपट युकेमध्ये प्रदर्शित व्हायचा आहे.

२) ब्लॅकलॅन्समॅन

- Advertisement -
BlacKkKlansman
ब्लॅकलॅन्समॅन

अॅडम ड्रायव्हर, टॉफर ग्रेस आणि जॉन डेव्हिड वॉशिंग्टन यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची गेट आऊटचे दिग्दर्शक जॉर्डन पेल यांनी निर्मिती केली आहे. कोलेरॅडो स्प्रिंग्जमध्ये आफ्रिकन अमेरिकन पोलीस गुप्तहेर असणाऱ्या व्यक्तीची ही खरी गोष्ट आहे. यावर्षी ब्लॅकलॅन्समॅन पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या नामांकनामध्ये आहे.

 

 

३) अंडर द सिल्व्हर लेक

चार वर्षांपूर्वी आपल्या फॉलो या कमी बजेट अमेरिकी चित्रपटाचे निर्माते डेव्हिड मिशेल यांच्या चित्रपटाने खळबळ माजवली होती. यावेळी आपला चित्रपट स्पर्धेत असल्यामुळे आपण अतिशय उत्साही असल्याचे डेव्हिड मिशेल यांनी सांगितले आहे. गुप्त कोड, रहस्यमय कथा हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

Under the silver lake
अंडर द सिल्व्हर लेक

४) कोल्ड वॉर

Cold War
कोल्ड वॉर

दोन भिन्न संस्कृतीमधील युरोपमधील १९५० च्या दशकातल्या दोन व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. २०१५ मध्ये बाफ्तामध्ये उत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पावलीकोवस्कीचा कोल्ड वॉर हा पहिलाच चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आला आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांनादेखील बऱ्याच अपेक्षा आहेत.

 

५) द मॅन व्हू किल्ड डॉन क्विझोट

यावर्षी टेरी गिलियमच्या डॉन क्विझोट चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरने फेस्टिव्हलची सांगता होईल अशी सध्या तरी चर्चा आहे. मात्र, परवानगीशिवाय हा चित्रपट दाखवू शकत नाही असा दावा करून चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एका निर्मात्याने हा चित्रपट अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्यावर मात करत गिलिमयने चित्रपट पूर्ण करून फेस्टिव्हलपर्यंत आणला आहे.

६) सोलो – ए स्टार वॉर स्टोरी

यावर्षीच्या फेस्टिव्हलमधील स्टार वॉर्सच्या विश्वातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर आहे. युके मध्ये २४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ब्रिटीश कलाकार सदस्य एमिलिया क्लार्क, थॅडी न्यूटन आणि फही वालर ब्रिज हेदेखील कान्स फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

७) द हाऊस दॅट जॅक बिल्ट

The House of jack built
द हाऊस दॅट जॅक बिल्ट

अमेरिकेत १२ वर्षांच्या कालावधीत स्थित असलेला, खून करणे ही एक कला आहे असे आपल्या कामाकडे पाहणारा एक अतिशय तल्लख असा सिरियल किलरच्या भूमिकेत मॅट डायलन द हाऊस दॅट जॅक बिल्टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक हा कान्स फेस्टिव्हलमधील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे.

 

८) फाहरेनहेट ४५१

रेड ब्रॅडबरीच्या क्लासिक कादंबरीवरून काढलेल्या या चित्रपटात मायकेल बी. जॉर्डन आणि मायकेल शॅनन स्टार यांनी अप्रतिम अभियन केला असल्याची सध्या चर्चा आहे. जॉर्डनने सध्याच ब्लॅक पॅंथर चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखविली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक रमिन बाहरानी यांनी ९९ होम्स या चित्रपटात शॅनानसह काम केले आहे.

९) व्हिटनी

Whitney
व्हिटनी

व्हिटनी हाऊसच्या शोकांतिक आणि रोलरकोस्टर करिअरने यापूर्वीच एका ब्रिटीश डॉक्युमेंटरी मेकरला प्रेरणा दिली होती. अधिकृत मान्यता घेऊन मॅकडोनाल्डला पूर्वीचे रेकॉर्डिंग्ज, तसेच न पाहिलेले घराचे फुटेज आणि तिचे लाईव्ह परफॉर्मन्स यांचा लेखाजोखा या चित्रपटात मांडता आला आहे. या स्कॉटिश दिग्दर्शकाची ही शैली असल्यामुळे हा चित्रपट प्रभावी ठरेल असे दिसते आहे.

 

१०) प्रोप फ्रान्सिस – ए मॅन ऑफ हिज वर्ड

जर्मन दिग्दर्शक विम वेंडर यांना दोन वर्षांपू्र्वी पोपच्या अभूतपूर्व आयुष्याशी निगडीत माहिती देण्यात आली. त्यांनी जीवनात्मक माहितीपटापेक्षा वैयक्तिक प्रवास म्हणून अधिक चांगले वर्णन केले आहे. पोपच्या पवित्र आणि इतर योजनादेखील यामध्ये अपेक्षित आहेत. या सर्वामधून निर्माण झालेला चित्रपट हा नक्कीच वेगळा असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -