घरताज्या घडामोडीमंदिरातला कारकुन झाला कोट्यधीश, ३०० रुपयांच्या तिकिटावर १२ कोटींची लागली लॉटरी!

मंदिरातला कारकुन झाला कोट्यधीश, ३०० रुपयांच्या तिकिटावर १२ कोटींची लागली लॉटरी!

Subscribe

असे म्हटले जाते की, ‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो.’ असाच प्रकार केरळ मधील कोची येथे घटला आहे. २४ वर्षांच्या अनंतु विजयन याला १२ कोटींची लॉटरी लागली आहे. अनंतु विजयन कोचिच्या एका मंदिरात कारकुनाच काम करतो. पण तो आता कोट्याधिश झाला आहे. ३०० रुपयांच्या लॉटरीच्या तिकीटावर त्याला १२ कोटींची लॉटरी लागली आहे. याबाबत अनंतु विजयन यांने सांगितले की, ‘मी ओणम बंपर लॉटरीचे ३०० रुपयांचे तिकीट विकत घेतले होते. त्यानंतर कर कापून मला ७.५ कोटी रुपये मिळणार आहेत’.

माहितीनुसार, अनंतुच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. त्याच त्याचे उत्पन्न पुरेसे नाही, जेणेकरून त्याचे कुटुंब चांगले जीवन जगू शकेल. त्याचे वडील पेंटर म्हणून काम करतात आणि त्याची बहीण एक फर्ममध्ये अकाउंटंट होती. पण लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेली.

- Advertisement -

अनंतु म्हणला की, ‘या दिवसात वडिलांचे काम सुरळीत चालू नव्हते. रविवार संध्याकाळी केरळ सरकारने ओणम बंपर लॉटरी २०२० निकाल जाहीर केला आणि तेव्हा आमच्या लोकांना धक्का बसला. १२ कोटींचे बक्षीस जिंकले असल्याचे आम्हाला कळाले.’ अनंतुचे कुटुंब दारिद्र्यात जगत होते. अशा परिस्थितीत १२ कोटींची लॉटरी जिकल्याने त्याच्या कुटुंबाचे आयुष्य बदलले. लॉकडाऊनमुळे अनंतुचे कुटुंब बऱ्याच संकटातून जात आहे. त्याच्या घराची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे.

दरम्यान या लॉटरीच्या पैशांचे काय करणार असे अनंतुला विचाराले तेव्हा तो म्हणाले की, आतापर्यंत एवढ्या पैशाचे काय करायचे हे ठरवले नाही आहे. सध्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लॉटरीचे तिकिट बँकमध्ये ठेवले आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -