घरदेश-विदेशइराणच्या मिसाइल हल्ल्यानंतर एअर इंडियाने मार्ग बदलला

इराणच्या मिसाइल हल्ल्यानंतर एअर इंडियाने मार्ग बदलला

Subscribe

अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे अन्य देशांच्या विमान कंपन्यांनी हवाई मार्गात बदल केला आहे.त्यात एअर इंडियाने इराणच्या हवाई हद्दीतून युरोप, अमेरिकेला जाणार्‍या आपल्या विमानांचे मार्ग बदलले आहेत. आमचे प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. अमेरिका-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली. हवाई मार्गात बदल केल्यामुळे उड्डाणाचा कालावधी वाढणार आहे. दिल्लीहून उड्डाण करणार्‍या विमानांना २० मिनिटे तर मुंबईहून ३० ते ४० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागणार आहे.

अमेरिकन फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -