घरदेश-विदेशमहासभेत दहशतवादी हल्ल्याची शक्यता - गुप्तचर यंत्रणा

महासभेत दहशतवादी हल्ल्याची शक्यता – गुप्तचर यंत्रणा

Subscribe

देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी महासभेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अयोध्येत जागोजागी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राम मंदिरासाठी आयोध्येत विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या महासभेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तरचर यंत्रणांनी वर्तवली आहे. या महासभेत दहशतवादी संताच्या वेशात येऊ शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी उत्तर प्रदेश पोलिसांना दिली आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अयोध्येत जागोजागी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा – अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

- Advertisement -

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

साधारणत: आठवड्याभरापूर्वी देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी महासभेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला होता, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या एका पोलीस अधिकार्यांने माध्यमांशी बोलताना सांगितले. गुप्तचर यंत्रणांच्या दिलेल्या माहिती नंतर राज्यभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एटीएस कमांडोसोबतच जागोजागी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयोध्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील धर्मशाला, हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली जात आहे. दहशतवादी गर्दीचा फायदा घेऊन हल्ला करु शकतात. त्यामुळे संताच्या गर्दीत जे संशयित असतील, त्यांचे छायाचित्र आणि माहिती गुप्तचर पथकांना दिली जाणार आहे. गुप्तचर यंत्रणेने महासभेत येमाऱ्या प्रत्येक भक्ताविषयी माहिती संकलित केली आहे. ही माहिती डीजीपी मुख्यालयाला देण्यात आली आहे. त्याचबरोबर अयोध्येत कसून चौकशी केली जात आहे. कुठलीही संशयास्पद हालचाल दिसली की ताबडतोब कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – अयोध्येत उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -