घरदेश-विदेशकारच्या 'या' फिचरमुळे महिलेची गाडीतच झाली सुरक्षित प्रसूती

कारच्या ‘या’ फिचरमुळे महिलेची गाडीतच झाली सुरक्षित प्रसूती

Subscribe

चालत्या गाडीमध्ये मुलाचा जन्म झाल्याच्या घटना आपण अनेकदा पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अचानक झालेल्या या प्रसूतीमुळे बाळाच्या जीवाला आणि आईच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. मात्र अमेरिकेमध्ये चक्क कारच्या नव्या फिचरमुळे महिलेची सुरक्षित प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया या शहरामध्ये एका गर्भवती महिलेने चालत्या Tesla इलेक्ट्रॉनिक कारमध्ये मुलाला जन्म दिला. कारमध्ये असलेल्या  फिचर ऑटो पायलट मोडमुळे हे शक्य झाल्याचं कळतंय

या घटनेमुळे या चिमुकल्याला टेसला बेबी असं संबोधल जातं. माहितीनुसार फिलाडेल्फिया शहरातील स्थानिक महिला Yiran Sherry तिचा पति Keating आणि त्यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा Rafa कारमधून प्रवास करत होते. यावेळी गर्भवती महिला Yiran Sherry यांचं वॉटर ब्रेक झालं. मात्र रसत्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्याने त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला.ट्रॅफिकमुळे त्यांची कार हळूहळू पुढे सरकत होती. मात्र आपल्या पत्नीची परिस्थिती पाहून  पतिने टेसला कारला ऑटो पायलट मोडवर टाकले आणि नेविगेशन सिस्टमला रुग्णालयात पर्यंतच्या सिस्टमध्ये सेट केलं.

- Advertisement -

Keating यांनी आपल्या बायकोची काळजी घेण्यासोबतच ते एका हाताने गाडी चालवत होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची पत्नी प्रसूत झाली. ही घटना त्यांना आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी या कपल्सने टेसला कारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नवजात बालकाचे मिडल नाव टेस ठेवलं आहे. ही संपूर्ण माहिती त्यांनी न्यूज आउटले Lnquirer मध्ये सांगितल आहे. माहितीनुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जेव्हा नर्सला या प्रकरणाबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने नवजात शिशूला ‘टेस्ला बेबी’ असं नाव दिलं.

- Advertisement -

हे हि वाचा – विसरा रोजची पळापळ अन् ट्रेनची गर्दी, वर्क फ्रॉम होम होणार पर्मनंट, मोदी सरकार आणतंय नवा नियम

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -