घरमहाराष्ट्रBaramati : हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला, विधानसभेतील मदतीबाबत फडणवीसांकडून शब्द

Baramati : हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला, विधानसभेतील मदतीबाबत फडणवीसांकडून शब्द

Subscribe

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याच्या निर्धाराने निवडणूक मैदानात उतरलेल्या भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची समजूत काढल्यानंतर फडणवीस यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळविले. तुम्हाला विधानसभा निवडणुकीत मदत केली जाईल, असा शब्द फडणवीस यांनी अजित पवार यांच्या वतीने दिल्याचे समजते.

हेही वाचा – NCP : यंदाच्या लोकसभेतही ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल, राष्ट्रवादीचा अमोल कोल्हेंना टोला

- Advertisement -

महायुतीसाठी विशेषतः अजित पवार यांच्यासाठी बारामतीची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार आपल्या घरच्या मैदानात आमने-सामने उभे ठाकणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीच्या लढतीकडे लागले असताना अजित पवार यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

पुरंदरचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना आव्हान दिले होते. शिवतारे यांनी बंडखोरीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत त्यांची समजूत काढली. महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर शिवतारे यांनी नरमाईची भूमिका घेतली. शिवतारे यांचे बंड थंड झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला मोर्चा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे वळविला. शिवतारे यांच्याप्रमाणे पाटील यांचा अजित पवार यांना प्रखर विरोध आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळला होता. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाच्या एकत्रित राष्ट्रवादीने इंदापूरची जागा पाटील यांना सोडण्यास नकार दिला होता. हा राग हर्षवर्धन पाटील यांच्या मनात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NIlesh Lanke : अजित पवारांना मोठा धक्का; आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवार पक्षात

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज, शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांना आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी बोलवून घेतले. महायुतीचा धर्म पाळा आणि आपल्या मित्र पक्षाला निवडणुकीत मदत करा. बारामतीची जागा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आली पाहिजे, अशा सूचना फडणवीस यांनी पाटील यांना केल्याचे समजते. तुम्ही लोकसभा निवडणुकीत अजितदादांना मदत करा, ते तुम्हाला विधानसभा निवडणुकीत मदत करतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी पाटील यांना दिली.

सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा – हर्षवर्धन पाटील

या भेटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आमच्याकडून महायुतीचा धर्म पाळला जाईल, असे सांगतानाच, आमच्याप्रमाणे अन्य घटक पक्षांनी महायुतीचा धर्म तालुका पातळीवर सुद्धा पाळला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आम्ही लोकसभेला मदत करतो तशी मदत आम्हाला विधानसभेला झाली पाहिजे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हेही वाचा – Ramdas Athawale : आठवले म्हणाले, माझ्या ‘या’ मागण्या भाजपकडून मान्य..!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -