घरमुंबईRam Naik VS Govinda : अभिनेता गोविंदावर केलेल्या आरोपावर आपण ठाम -...

Ram Naik VS Govinda : अभिनेता गोविंदावर केलेल्या आरोपावर आपण ठाम – राम नाईक 

Subscribe

मुंबई : अभिनेता गोविंदा यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची मदत घेतली होती. या माझ्या आरोपावर मी आजही ठाम असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी आज (29 मार्च) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. (Ram Naik VS Govinda We stand firm on the allegation against actor Govinda Ram Naik)

हेही वाचा – Maharashtra Politics : वसंत मोरे- प्रकाश आंबेडकर भेटीने राज्यात नवे राजकीय समीकरण?

- Advertisement -

अभिनेता गोविंदा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदा काँग्रेसमधून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे बडे नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यावेळी राम नाईक यांनी गोविंदा यांच्यावर दाऊदशी संबंधित गंभीर आरोपही केले होते. गोविंदा शिवसेनेत आल्यानंतर राम नाईक यांनी आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

गोविंदा यांनी दाऊदची मदत घेतल्याच्या आपल्या आरोपावर मी ठाम आहे. त्यांनी माझे आरोप फेटाळून लावले नाहीत. त्याला आव्हानही दिले नाही. त्याचे कोणी मित्रही इतक्या वर्षात आरोप खोडून काढायला आले नाहीत. माझ्या पुस्तकात मी या आरोपाचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशित होऊन सात-आठ वर्षही झाले आहेत. इतक्या वर्षात ते काहीच बोलले नाहीत. माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जाईल असे काही मी कधी इतक्या वर्षात बोललो नाही. शब्द मागे घेण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही. मी विचार करूनच बोलत असतो, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Raut VS Ambedkar : आंबेडकरांना माझ्यावर खापर फोडू द्या; वंचितच्या नाराजीवर राऊतांची भूमिका

गोविंदा यांच्यासोबत माझा परिचय आहे. पण मी त्यांना कधीच मित्र म्हणू शकणार नाही. ते माझ्याविरोधात निवडणूक लढले आणि जिंकले होते. आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. गोविंदा यांनी उमेदवारी मिळाल्यावर काही भूमिका मांडल्यास त्यावर मी नक्की बोलेन. राजकारणात जर तर असे काहीच नसते. होय किंवा नाही या दोन शब्दातच सर्व काम करायचे असते. गोविंदा खोटे बोलतात की काय अशी रुखरुख माझ्या मनात कायम आहे. मी राजकारण सोडले आहे. मी राजकारणात जाणार नाही, असे गोविंदा एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा बोलले. त्यानंतर ते पुन्हा राजकारणात आले. त्यामुळे ते खोटे बोलत असल्याचे मला वाटतेय, असा चिमटाही नाईक यांनी काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -