घरदेश-विदेशभारतीय वंशाच्या बेपत्ता सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह अमेरिकेतील तलावात सापडला

भारतीय वंशाच्या बेपत्ता सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह अमेरिकेतील तलावात सापडला

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेतील मेरीलँड येथील तलावातून ३० वर्षीय भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह सापडला आहे. अंकित बगई (Ankit Bagai) असे मृत इंजिनिअरचे नाव असून तो जर्मन टाउनचा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारचा कट नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (The body of a 30-year-old Indian American software engineer has been found in a lake in Maryland, USA)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित बगई हा व्यक्ती गेल्या 10 दिवसांपासून म्हणजे ९ एप्रिलपासून बेपत्ता होता. 9 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता माईलस्टोन प्लाझाजवळील उपचार केंद्रातून बाहेर पडला होता. त्याला पँथर्स रिज ड्राइव्हच्या 12000 ब्लॉकमध्ये शेवटचे पाहिले गेले होते. तो बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. अंकित बगई व्हर्जिनिया किंवा वॉशिंग्टन डीसीमध्ये असण्याची शक्यताही कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली होती. अंकितच्या कुटुंबाने शॉपिंग मॉल आणि आजूबाजूच्या परिसरातही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी अंकितचा फोटो पोस्टर ठिकठिकाणी लावले होते आणि त्याची माहिती देणार्‍याला कुटुंबाने $5,000 बक्षीसही जाहीर केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – लष्कराच्या गाडीला आग लागल्याने ५ जवानांना वीरमरण; वीज पडल्याची सूत्रांची माहिती

मॉन्टगोमेरी पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले की, अंकित बगईचा लेक चर्चिल तलावात मृतदेह सापडला. स्थानिकांनी तलावात मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख अंकित बगई अशी होती, तो जर्मनटाउनचा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र त्याच्या मृत्यूमागे कोणत्याही प्रकारचा कट नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

अंकितच्या मेहुण्याने सांगितले की, “अंकित ज्या दिवशी बेपत्ता त्या दिवशी पोलिसांना चर्चिल लेकमध्ये एक व्यक्ती असण्याची बातमी मिळाली होती. सोनार ड्रॅग हुकच्या साह्याने पोलिसांनी तीन ते चार तास शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काहीही मिळाले नाही. अंकित हा व्हर्जिनिया विद्यापीठाचा पदवीधर आहे. त्याला जीव वाचवणारी अनेक औषधे दिली जात होती.

हेही वाचा – युक्रेनमधील युद्धादरम्यान आकाशात काही तरी चमकले! लोकांमध्ये भीती; काय आहे प्रकरण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -