घरदेश-विदेशबंगल्याचे वीज, पाणी, गॅस कनेक्शन तोडणार

बंगल्याचे वीज, पाणी, गॅस कनेक्शन तोडणार

Subscribe

खासदारकी जाऊन दोन महिने उलटले तरीही २०० पेक्षा जास्त खासदारांनी त्यांचे ल्युटियन्स दिल्लीतील सरकारी बंगले अद्याप खाली केलेले नाहीत. या माजी खासदारांवर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या हाऊसिंग समितीने, या माजी खासदारांना एका आठवड्यात सरकारी बंगले सोडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या तीन दिवसांत या बंगल्यांचे वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन तोडण्यात येणार आहे.

लोकसभा हाऊसिंग समितीचे अध्यक्ष सी. आर. पाटील म्हणाले की, समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या बंगल्यांचे वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन तीन दिवसांत तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका आठवड्यात सर्व माजी खासदारांना आपले सरकारी बंगले सोडण्यास सांगितले आहे. मात्र, आपण बंगला खाली करणार नाही, असे कोणाही माजी खासदाराने सांगितले नाही.

- Advertisement -

मागील लोकसभेचे विसर्जन झाले की, एका महिन्यात सरकारी बंगले खाली करणे नियमानुसार बंधनकारक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २५ मे रोजी १६ व्या लोकसभेचे विसर्जन केले. मात्र २०० पेक्षा जास्त खासदारांनी त्यांना २०१४ साली मिळालेले बंगले खाली केलेले नाहीत. या माजी खासदारांनी त्यांना मिळालेले सरकारी बंगले अद्याप खाली केलेले नसल्यामुळे नव्या खासदारांना तात्पुरत्या निवासस्थानी रहावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -