घरताज्या घडामोडीCOVID 19 tests: देशात २४ तासांत ४ लाखांहून अधिक चाचण्या!

COVID 19 tests: देशात २४ तासांत ४ लाखांहून अधिक चाचण्या!

Subscribe

देशभरात २४ तासांत ४ लाख ४६ हजार ६४२ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ४ लाख ४६ हजार ६४२ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली आहे. देशांत मागील २४ तासांत सर्वाधिक ५२ हजार १२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाख ८३ हजार ७९२ वर पोहोचला असून यापैकी ३४ हजार ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख २८ हजार २४२ रुग्ण असून सध्या १ लाख २० हजार ५८२ रुग्णांनी कोरोनावप मात केली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Corona Live Update: Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक ५२, १२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -