लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचं काम पूर्ण होणार, अमित शाहांकडून तारखेचा खुलासा

Ram Mandir | राम मंदिराबाबतची कायदेशीर लढाई १३५ वर्षांपेक्षा जास्त वेळ चालली. १५ व्या शतकापासून सुरू असलेल्या लढाईला २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला. सर्वोच्च न्यायालयाने या विवादीत जमीनीवर राम मंदिराच्या उभारण्याची परवानगी दिली. तसंच, मुस्लिम समाजाला दुसरी जागा देण्याचे ठरवण्यात आले, असं अमित शाहा म्हणाले.

Three-member panel formed to probe security lapses during PM Modi's Punjab visit

Ram Mandir | नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीवरून मोठी घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर तयार होईल, असं अमित शाह म्हणाले आहेत. राम मंदिरात जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी समस्त देशवासी आतुर झाले आहेत. त्यामुळे हे मंदिर पूर्ण होऊन दर्शनासाठी कधी खुलं होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अमित शाहांनी तारखेबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच राम मंदिर दर्शनासाठी खुलं होऊ शकतं.

हेही वाचा – लोक मोहिमेशी जोडले जातात तेव्हा… पंतप्रधान मोदींनी सांगितले अभियानाच्या यशाचे गमक

अमित शाहा म्हणाले की, राम मंदिरप्रश्नी काँग्रेसच्या काळात कोर्टकचेरी सुरू होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि मोदींनी त्याच दिवशी राम मंदिराचे भूमीपूजन पूर्ण करून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. आता १ जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर तयार झालेलं असेल, असं अमित शाहा म्हणाले.


राम मंदिराबाबतची कायदेशीर लढाई १३५ वर्षांपेक्षा जास्त वेळ चालली. १५ व्या शतकापासून सुरू असलेल्या लढाईला २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला. सर्वोच्च न्यायालयाने या विवादीत जमीनीवर राम मंदिराच्या उभारण्याची परवानगी दिली. तसंच, मुस्लिम समाजाला दुसरी जागा देण्याचे ठरवण्यात आले, असं अमित शाह म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक ट्रस्ट बनवून भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात केली गेली. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिराचे भूमी पूजन झाले.

दरम्यान, २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधीच राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यास भाजपाला याचा फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच या मंदिराचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याच्या चर्चांना आता बळ मिळालं आहे.

हेही वाचा – एअर इंडियातील घृणास्पद प्रकार : आरोपीला पकडण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत दाखल