राशीभविष्य: रविवार 20 मार्च ते शनिवार 26 मार्च 2022

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष :-या सप्ताहात मीनेत सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. तुमचे मन खंबिर राहील. त्यामुळे राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. तुम्ही ठरविलेल्या कार्यक्रमात यश मिळेल. धंद्यात मेहनत घ्या. धंदा वाढवा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. संसारातील कामे होतील. मुलांची प्रगती आनंद देईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. अरेरावी कुठेही करू नका. नवीन ओळखीमुळे अडलेले काम करून घेता येईल. संशोधनाच्या कामात वरिष्ठ कौतुक करतील. महत्त्वाची सर्व कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करून घ्या. विद्यार्थी वर्गाने भ्रमात न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. शुभ दि. 20, 21

वृषभ :-या सप्ताहात मीन राशीत सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते. धंद्यात मोठे काम मिळवता येईल. थकबाकी वसूल करू शकाल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजना पूर्ण करता येतील. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. पदाधिकारी मिळू शकेल. संसारात शुभवार्ता समजेल. जीवनसाथीबरोबरचा वाद मिटवता येईल. कोर्टाच्या कामात चांगली घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात नाव वाढेल. नवीन मोठ्या लोकांची ओळख होईल. संशोधनात यश मिळवाल. विद्यार्थी वर्गाने व्यवस्थित अभ्यास करावा. चांगले यश मिळवता येईल. शुभ दि. 23, 26

मिथुन :-मीन राशीत सूर्य, कुंभ राशीत बुध वक्री होत आहे. धंद्यात प्रगतीची संधी मिळेल. खोट्या आशा दाखवणार्‍या लोकांच्यावर एकदम विश्वास टाकू नका. संसारात तणाव व चिंता होईल. मैत्रीत दुुरावा येऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे कार्य चालू ठेवा. तरच तुमची प्रतिष्ठा टिकून राहील. नोकरीत वरिष्ठांना खूश ठेवता येईल. सप्ताहाच्या मध्यावर एखादा प्रश्न मन अस्वस्थ करेल. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होतील. संशोधनाच्या कामात तप्तरता ठेवा. सहकारी वर्गाला सांभाळून घ्यावे लागेल. विद्यार्थी वर्गाने सकस आहार द्यावा. परीक्षेत अडचण येऊ नये याकडे लक्ष द्यावे. अभ्यास करावा. शुभ दि. 24, 25

कर्क :-मीन राशीत सूर्य प्रवेश, कुंभ राशीत बुध वक्री होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल, तसेच एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. धंद्यात हिशोब नीट करा. कामगारांची व्यथा ऐकावी लागेल. संसारात वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात अरेरावी नको. दडपण आणू नका. तटस्थ रहा. प्रगतीची संधी शोधा. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत व्याप राहील. संशोधनाच्या कामात संमिश्र घटना घडतील. कोर्टकेस त्रासाची वाटेल. मित्र मदत करतील. परक्षेसाठी मुलांनी मेहनत घ्यावी. मोठे यश घेता येईल.
शुभ दि. 25, 26

सिंह :-मीन राशीत सूर्य प्रवेश, कुंभेत बुध वक्री होत आहे. या सप्ताहात तुम्ही प्रयत्नाने कोणत्याही कामात यश मिळवू शकाल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा निर्णय बरोबर का चूक यावर चर्चा होईल. तुमचे मनोधैर्य टिकून राहील. धंद्यात मेहनत घ्या. पैसे गुंतवण्याची घाई करू नका. खोट्या भूलथापा देऊन मोठ्या फायद्याच्या गोष्टी करणारे लोक भेटतील. सावध रहा. सरकारी कामात नम्रता ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीसाठी झगडावे लागेल. कोर्टकेस कष्टाची ठरेल. संशोधनाच्या कामात सप्ताहाच्या सुरुवातीला यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने वाकड्या वाटेने यशाच्या मागे न लागता अभ्यास करावा. शुभ दि. 23, 25

कन्या :-मीन राशीत सूर्य प्रवेश, कुंभेत बुध वक्री होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. संताप वाढवणारी घटना घडेल. हाणामारीचा प्रसंग टाळा. कायदा पाळा. धंद्यात समस्या येईल. प्रेमाने प्रश्न सोडवता येईल. तडजोडीचे धोरण तात्पुरते ठेवावे लागेल. बढती मिळेल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नोकरीत कायदा पाळा. संशोधनाच्या कामात कामाचा व्याप वाढेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. प्रयत्न जास्त करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 21, 23

तूळ :-मीन राशीत सूर्य, कुंभेत बुध वक्री या सप्ताहात होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर कामाचा व्याप राजकीय-सामाजिक कार्यात वाढेल. सहकारी, नेते पाहिजे तशी मदत करण्यात कुचराई करण्याची शक्यता आहे. धंद्यात नेटाने मेहनत घ्या. कुठेही मोठेपणाची भावना ठेऊन बोलू नका. होणारे काम विस्कटू शकते. संसारात खर्च वाढेल. तणाव वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात संघर्ष करावा लागेल. जिद्द ठेवा. नोकरीत वरिष्ठांचे मत विचारात घ्या. संशोधनात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. पैसे गुंतवण्याची घाई करू नका. शुभ दि. 20, 22

वृश्चिक :-मीनेत सूर्य प्रवेश, कुंभेत बुध वक्री होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या धोरणावर जोरदार टीका होईल. विरोध दर्शवला जाईल. प्रवासात धोका होऊ शकतो. वाहन जपून चालवा. कायद्याचे पालन सर्व ठिकाणी करा. धंद्यात काम मिळवता येईल. चांगले मित्र तुमची बाजू घेतील. धावपळ वाढेल. घरातील कामे करावी लागतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा अटीतटीची होईल. नोकरीत अरेरावी करून चालणार नाही. संशोधनाच्या कामात दिशा मिळाली तरी वेळ जास्त खर्च होईल. विद्यार्थी वर्गाने नम्र रहावे. खोट्या प्रकाराने यश मिळवू नये. चांगली संगत व सकस आहार घ्यावा. शुभ दि. 24, 26

धनु :-मीन राशीत सूर्य, कुंभेत बुध वक्री या सप्ताहात होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. ओळखीचा उपयोग करून घ्या. घरातील कामे करून घेता येतील. वाटाघाटीचा प्रश्न सर्वानुमते सोडवा. स्वतःसंबंधीच्या समस्येवर तोडगा काढता येईल. संघर्ष करूनच मार्ग मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रगती करा. लोकसेवा करूनच तुमचे नाव वाढेल. राजकारणात पदाधिकार मिळू शकेल. सप्ताहाच्या मध्यावर अडचण निर्माण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. नवे काम मिळेल. संशोधनाच्या कामाला दिशा मिळेल. लवकर प्रश्न सोडवा. विद्यार्थी वर्गाने अपयश टाळण्याचा प्रयत्न करावा. शुभ दि. 22, 24

मकर :-या सप्ताहात मीनेत सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोध मोडून काढता येईल. तुमच्या कामात लुडबुड करणारे असले तरी प्रगती रोखता येणार नाही. तुम्ही रागावर ताबा ठेवा. योग्य तेच बोला. व्यवसायात प्रगतीचा नवा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करणारे येतील. संधी सोडू नका. शेअर्समध्ये फायदा होईल. प्रवासात घाई करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. स्पर्धा खूप कठीण असेल. संशोधनाच्या कामात तडफदार वृत्ती दिसेल. वरिष्ठ कौतुक करतील. खरे सरकारी, मित्र ओळखता येतील. परीक्षेसाठी जास्त तयारी करा. चिंता नको चिंतन करा. शुभ दि. 25, 26

कुंभ :-मीन राशीत सूर्य, तुमच्याच राशीत बुध वक्री होत आहे. राजकारणात असो समाजकार्यात आत्मविश्वासाने तुम्ही भूमिका निभावू शकाल. गुप्त कारवायांना मोडून काढता येईल. क्षुल्लक लोक तुमच्यावर टीका करतील. घरगुती समस्या राहील. घरात नाराजी असू शकते. खाण्याचे तंत्र सांभाळा. नोकरीत काम वाढेल. तरीही तुमचे कौतुकही होईल. मौल्यवान वस्तू नीट ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नावलौकिक वाढेल. जवळचे लोक तुमचा हेवा करतील. संशोधनाच्या कामात तुम्हालाच लक्ष द्यावे लागेल. धंद्यात वाढ व फायदा करून घेता येईल. परीक्षेत यश मिळेल.
शुभ दि. 21, 22

मीन :-तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, कुंभेत बुध वक्री या सप्ताहात होत आहे. धंद्यात जम बसेल. कुणालाही शब्द देताना सावधपणे द्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होईल. गैरसमज दूर करून नव्या कामाची सुरुवात होईल. बुद्धिचातुर्याने प्रगती करून घ्या. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. डोळ्यांची काळजी घ्या. कला-क्रीडा साहित्यात प्रगतीची संधी कमी होईल. सप्ताहाच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. परीक्षेसाठी तयारी करा. इतर विचार करण्यात वेळ घालवू नका. शुभ दि. 22, 26