घरदेश-विदेशलंडनमध्ये सापडले ३ बॉम्ब, लोकांमध्ये प्रचंड दहशत

लंडनमध्ये सापडले ३ बॉम्ब, लोकांमध्ये प्रचंड दहशत

Subscribe

तपासणीदरम्यान एका बॅगेमधील डिव्हाईसला आग लागल्यामुळे छोटासा स्फोट झाला. मात्र, स्फोटाचे स्वरुप सौम्य असल्यामुळे सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. 

भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, दुसरीकडे लंडनमध्येही एक थरकाप उडवणारा प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर एकाचवेळी ३ बॉम्ब आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आहे. लंडनचे हिथ्रो विमानतळ, वाटरलू स्‍टेशन आणि सिटी विमानतळ या तीन ठिकाणी बाॅम्‍ब आसल्‍याची माहिती ब्रिटनच्या दहशतवादी विरोधी पोलिस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी तपासासाठी पोहचले असता, त्यांना तीन छोट्या बॅग्समध्ये स्फोटके आढळली. उपलब्ध माहितीनुसार, तपासणीदरम्यान एका बॅगेमधील डिव्हाईसला आग लागल्यामुळे छोटासा स्फोट झाला. मात्र, स्फोटाचे स्वरुप सौम्य असल्यामुळे सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, हिथ्रो विमानतळावर सापडलेल्या बॅगची तपासणी करत असताना ज्यावेळी बॅगेचा एक कप्पा उघडण्यात आला त्यावेळी त्यामध्ये ठेवलेल्या डिव्हाईसला अचानक आग लागली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्वरित जवळची संपूर्ण इमारत रिकामी केली. स्फोटकांची दुसरी बॅग सिटी विमानतळावर तर तिसरी बॅग वाटरलू स्‍टेशनवर सापडली. स्थानिक पोलीस आणि एअरपोर्ट पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतली असून, हे बॉम्ब नक्की कुठून आले आणि कुणी प्लांट केले याचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, बॉम्ब सापडल्याचं हे वृत्त प्रसिद्ध होताच स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलं होतं.

- Advertisement -

याआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ साली लंडनच्या मँचेस्टर भागात एकापाठोपाठ एक ५ बॉम्ब हल्ले झाले होते. ज्यामध्ये सुमारे ३६ लोकांचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -